मराठवाडा

लाचखोर अप्पर जिल्हाधिकारी कांबळेे अखेर निलंबित

दत्ता देशमुख

बीड : जिल्हा पुरवठा विभागातील धान्य घोटाळ्याप्रकरणी सोयीचा अहवाल देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक झालेले अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे यांना गुरुवारी सेवेतून निलंबित करण्यात आले. ता. 02 फेब्रुवारीला कांबळे व बीड तहसीलमधील अव्वल कारकुन महादेव महाकुडे यांना लाच घेताना कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानातून अटक झाली होती. यानंतर या दोघांचीही पोलिस आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्यानंतर कांबळे रुजूही झाले होते.

बीड तहसील पुरवठा विभागातील गोदामामधून 14 हजार 500 क्विंटल धान्याचा अपहार करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरुन अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांनी ऑगस्ट 2018 मध्ये त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली होती. 2013 पासून गोदामातून दुकानदारांनी उचलेले धान्य व केलेल्या अपहारासंदर्भातील अहवाल 19 जानेवारी रोजी बी.एम.कांबळे यांच्याकडे दिला होता. या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यामार्फत आपण या घोटाळ्यात नसल्याचे तसेच या प्रकरणाची मुळ कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे अहवाल वरिष्ट पातळीवर पाठवताना सोयीस्कर देण्यात यावा असे मागणी केली होती. मात्र यावेळी तोडगा निघाला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 

त्यानंतर तहसील विभागातील अव्वल कारकून महादेव महाकुडे यांच्या मार्फत हे प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र त्यानंतर पाच लाख देण्याचे ठरले, या प्रकरणात दोषी असलेल्या एका कर्मचाऱ्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार 31 जानेवारी रोजी दिली होती. त्यानूसार दोन फेब्रवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. कांबळे व महाकुडे यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना विशेष न्यायालय बीड यांच्यासमोर हजर केले त्यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी व त्यानंतर पुन्हा त्यांना पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली होती. 13 फेब्रवारी रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

महाकुडे देखील होणार निलंबित
या प्रकरणातील मुख्य आरोपी अप्पर जिल्हाधिकी बी.एम.कांबळे यांच्यावर कारवाई झालेली नसल्यामुळे सहआरोपी महेदेव महाकुडेला देखील निलंबित करण्यत आलेले नव्हते. मात्र, कांबळे निलंबित झाल्यामुळ महाकुडे याला देखील निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT