Murder case
Murder case sakal media
मराठवाडा

अज्ञात आरोपींकडून बालकाचे अपहरण, खून करून फेकले दरीत

सकाळ वृत्तसेवा

शिऊर : गुरुवारी (ता.17) फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तलवाडा (ता.वैजापुर) घाटात काही इसम बकऱ्या चारत असताना त्यांना अचानक एका अनोळखी बालकाचे प्रेत दरीत पडलेले असल्याचे दिसून आले. त्याची माहिती त्यांनी शिऊर पोलीसांना दिली असता सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन सदर बालकाच्या प्रेतास बाजूला घेऊन लोणी खुर्द येथील वैद्यकिय अधिकारी यांच्या मदतीने जागेवरच शवविच्छेदन करून दफनविधी करण्यात आला. (Marathwada Crime News)

ओळख पटविण्यासाठी सदर मृत बालकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सार्थक रमेश बागुल (वय 9) रा.खंडाळा (ता.वैजापुर) असे या बालकाचे नाव निष्पन्न झाले.(ता.11) फेब्रुवारी रोजी त्या बाबद वैजापूर पोलीस ठाण्यात अपहरणा चा गुन्हा नोंद झालेला आहे. मृत बालकाचे वर्णन व वैजापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेल्या बालकाचे वर्णन सारखे मिळून आले.

"दफनविधी केल्यानंतर प्रेत पुन्हा उकरले"

मृत बालकाची आणि वैजापूर पोलीस ठाण्यात अपहरणा बाबद गुन्हा नोंद असलेल्या बालकाचे वर्णन सारखे मिळून आल्याने घटनास्थळी वैजापूर पोलीस आणि बेपत्ता बालकाचे आई वडील येताच तहसीलदार राहुल गायकवाड यांनी पंचनामा करुन पोलीसांनी मृत बालकाचे प्रेत पुन्हा उकरले. आई वडिलांनी ते बघताच मृत बालक आमचा सार्थकच आहे असे म्हणून मोठा हंबरडा फोडला.

घटनास्थळी वैजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती,तहसीलदार राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वैजापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत,सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक फौजदार तिलकचंद पवार,पोलीस कॉन्स्टेबल विष्णू जाधव,संदिप धनेधर,अविनाश भास्कर,अमोल मगर,गणेश गोरक्ष आदींनी ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले. अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT