file photo 
मराठवाडा

सरपंचासह ग्रामसेवकानी केला १५ लाखाचा अपहार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गाव विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालय कोल्हेबोरगाव (ता. बिलोली) आलेल्या शासकिय निधीचा अपहार करणाऱ्या महिला सरपंचासह ग्रामसेवकावर अपहाराचा गुन्हा रामतिर्थ पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. 

बोरगाव (कोल्हे) येथील विकासासाठी केंद्र शासनाने चौदाव्या वित्त आयोगाकडून ता. १९ सप्टेंबर २०१७ ते ता. १४ आॅगस्ट २०१९ दरम्यान ३२ लाख ३३ हजार २६६ रुपये ग्रामपंचायत कार्यालयाच्या बँक खात्यात जमा केले होते. या निधीतून गावातील १५ लाख ३२ हजार ९५५ रुपयाचे काही विकास कामे केली. परंतु उर्वरीत रक्कम ३२ लाख ३३ हजार २६६ रुपयाचे कामे झाल्याचे कागदपत्राद्वारे दाखवून या रक्कमेचा स्वत: च्या फायद्यासाठी अपहार केला. ही बाब तपासणीअंती उघड झाली. या प्रकरणी पंचायत समिती बिलोलीचे विस्तार अधिकारी प्रकाश मुसळे यांच्या फिर्यादीवरुन रामतिर्थ पोलिस ठाण्यात सरपंच महिलेसह ग्रामसेवक राजेंद्र दशरथ भोंगे यांच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. घाडगे करत आहेत. 

नांदेडात भरदुपारी घरफोडी 

नांदेड : शहराच्या अंबिकानगरमध्ये सोमवारी (ता. २७) भरदुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. कपाटातील नगदी व सोन्या- चांदीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शहराच्या अंबिकानगरमध्ये राहणारे शिवाजी आनंदराव शिंदे हे नोकरीनिमित्त सकाळीच घराबाहेर पडले. त्यानंतर घरातील सर्व कामे आटोपून त्यांची पत्नी जवळच असलेल्या गणपती दर्शनासाठी घराला कुलूप लावून आपल्या मैत्रीणींसह दुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास गेल्या होत्या. याच काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडले. 

सोन्या- चांदीच्या दागिण्यावर हात साफ

घारत प्रवेश करून बेडरुमधील कपाट फोडून नगदी व सोन्या- चांदीचा असा एक लाख एक हजार ६१८ रुपयाचा ऐवज लंपास केला. दर्शन करून साडेतीन वाजता श्रीमती शिंदे आपल्या घरी आल्या असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहिले तर कपाट फोडून चोरी केल्याचे दिसले. त्यांनी लगेच आपल्या पतीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पती शिवाजी शिंदे यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा तपास फौजदार सुरेश नरवाडे करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT