rain-in-latur.jpg
rain-in-latur.jpg 
मराठवाडा

लातूर : वांजरवाडा-कंधार रस्त्यावरील पुलावर पाणी

विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २०) रात्रीपासून सोमवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत या वर्षीच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस झाला आहे.

चोवीस तासात सुारे ६१.७१ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून उदगीर, अहमदपूर व जळकोट तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक १९९ मिलीमीटर पाऊस घोणसी (ता. जळकोट) महसूल मंडळात झाला असून तब्बल १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. 

जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता. १९) दमदार पावसाला सुरवात झाली आहे. शनिवारी थोडा पाऊस झाल्यानंतर रविवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस ठरला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिक पाण्याखाली गेले असून नदी व नाल्यांना पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली असून सखल भागात पाणी साचले आहे. मोठा पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

काही तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून घोणसी मंडळात १९९ मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर लातूर तालुक्यातील गातेगाव मंडळात ६०, बाभळगाव - ६१, औसा तालुक्यातील औसा- ८८, मातोळा- ९४, उदगीर तालुक्यातील हेर- १४०, वाढवणा- १२८, नळगीर- १४५, नागलगाव- ८०, अहमदपूर तालुक्यातील- अहमदपूर- ६७, किनगाव- ६२, खंडाळी- ७२, हडोळती- ७४, चाकूर तालुक्यातील चाकूर- ६४, नळेगाव- ८४, शेळगाव- १११, जळकोट तालुक्यातील जळकोट- १३५, घोणसी- १९९ तर शिरूर अनंतपाळ मंडळात ६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे-  लातूर- ४८.६३, औसा- ४७.४३, रेणापूर- ३७.२५, उदगीर- ८८.७१, अहमदपूर- ६४.६७, चाकूर- ६८.६०, जळकोट- १६७, निलंगा- १८.५०, देवणी- ३६ व शिरूर अनंतपाळ- ४०.३३
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT