Ram-Shinde
Ram-Shinde 
मराठवाडा

जलसंधारण मंत्र्यांची सासरवाडीच तहानलेली!

सकाळवृत्तसेवा

पाटोदा - सध्या संपूर्ण पाटोदा तालुका हा दुष्काळात होरपळत असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाण्याचे प्रचड दुर्भिक्ष आहे. राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची सासरवाडी असलेले व विशेष म्हणजे सासरे गावचे सरपंच असलेल्या तालुक्‍यातील धनगर जवळका या ठिकाणी ऐन दुष्काळात ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना पाण्यासाठी वेठीस धरले जात आहे. 

याठिकणी विहीर व कूपनलिका अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. त्याचे पाणी काही ठराविक लोकांनाच मिळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तत्काळ सोय करा या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी २९ एप्रिलरोजी बीड-नगर रोडवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाटोदा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गावातील ज्या ठिकाणी विहीर व कूपनलिकेचे अधिग्रहण केले आहे ते रद्द करून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. त्याचप्रमाणे अधिग्रहण करण्यात आलेल्या ठिकाणचे आतापर्यंत ग्रामस्थांना पाणीच मिळाले नसल्यामुळे त्याची देयके अदा करण्यात येऊ नयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT