Water Crisis in Paithan Tahsil
Water Crisis in Paithan Tahsil sakal
मराठवाडा

Water Tanker : गावोगावी टँकरचा धुराडा...! पैठण तालुक्यात टँकरने ओलांडली पंच्याहत्तरी; टँकरवर भागेना तहान

हबीबखान पठाण

पाचोड - मागील वर्षी मे महिन्यात नागरिकांची तहान भागविण्यासा ठी सुरू करण्यात आलेले टँकर सलगरिल्या आजमितीलाही सुरूच असून गाव व टँकरचा आकडा दुपट्टीने वाढून त्यांनी पंच्याहत्तरी ओलांडली आहे. टँकर सुरू असुनही तहान भागत नसल्याने टॅकरग्रस्त गावांतील नागरिकांचा घसा कोरडा राहून त्यांना घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

टँकरच्या 'क्षमते' विषयी नागरिकांसह प्रशासनही अनभिज्ञ असल्याने पैठण तालुक्यातील नागरिकांची पाणीटंचाई चा सामना करतांना दमछाक होतांनाचे चित्र पाहवयास मिळते. तालुक्यातील दहा मंडळातंर्गत ६९ गावांत पाण्याचे 'दूर्भिक्ष्य' निर्माण होऊन नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनावर ७७ टँकरच्या १३१ खेपाद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याची नामुष्की ओढवली आहे.

पैठण तालुक्यात जायकवाडी सारखा भव्य जलाशय असतानाही तालुक्यातील ९२ गावांना या पाण्याचे दर्शन झालेले नाही. तालुक्यात अलिकडील दोन वर्ष वगळता समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्व जलसाठे कोरडीठाक राहून भर पावसाळ्यातच विहीरीनी तळ गाठला. कोटयावधी खर्चून कार्यान्वित केलेल्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्या.

तालुक्यातील पाझर तलाव, मध्यम लघू प्रकल्प कोरडेठाक पडल्याने अहोरात्र पाणी खेचणारे विद्यूतपंप दीर्घविश्रांती घेत आहे. तालुक्यातील १८९ गावांपैकी ६९ गावांना ७७ टॅकरने पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या टॅकरच्या पाण्यात सर्वच यंत्रणा हात धुवून घेत आहे. ठरवून दिलेले ठिकाण व ठरवून दिलेल्या खेपा, टॅकरची क्षमता हे केवळ कागदावरच पूर्ण होत आहे.

टॅकरचे पाणी भरताना होणारे भांडणे पाहून प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे टॅकर थेट पाणीपुरवठा विहीरीत सोडले जात असल्याने ग्रामस्थांना किती टँकर आले अन् किती खेपा झाल्या याची कल्पनाही येत नाही. टॅकर सुरू असलेल्या गावांत नळाद्वारे पाणी येण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. केवळ १५ ते २० मिनिटे पाणी मिळत असल्याने नागरिकांना रानोमाळ भटकंती करून डोक्यावर ,बैलगाडी, सायकलीद्वारे पाणी आणावे लागते.

तालुक्यातील यंदा ता.१९ मे २०२३ रोजी आडूळ खूर्द येथे सर्वप्रथम टँकर सुरू होऊन त्याची व्याप्ती वाढत जाऊन ६९ गावांपर्यंत पोहचून या गावांना ७७ टँकरने पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. २४ हजार लिटर क्षमतेचे टँकर दाखवून जनतेच्या माथी १८ हजार लिटर तर बारा हजार लिटरचे टॅकर दाखवून चक्क नऊ ते दहा हजार लिटरचे तेही गळती लागलेल्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅकरची आतापावेतो जिल्हा परिषद , महसूल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तपासणीच केली नसल्याचे दिसून येते.

टँकर सुरु असलेले गावे -

हर्षी खूर्द,हर्षी बु॥, थेरगाव, डोणगाव, मिरखेडा, सुलतानपूर, रांजणगाव दांडगा, कडेठाण खूर्द, गेवराई बु।।, गेवराई मर्दा, गेवराई खूर्द, तूपेवाडी, तुपेवाडी तांडा, पारुंडी तांडा, केकतजळगाव, चौंढाळा, पारुंडी, पाडळी, गाजीपूर, मुरमा, कोळी बोडखा, पोरगाव, पोरगाव तांडा, चिंचाळा, सानपवाडी, आंतरवाली खांडी, जामवाडी तांडा, दरेगाव, देवगाव, देवगाव तांडा, टेकडी तांडा, खादगाव, दाभरूळ, एकतुनी, ब्राम्हणगाव, अब्दुल्लापूर, होनोबावाडी, रजापूर, थापटी, आडगाव जावळे आदी.

विहीरीचे अधिग्रहण -

मिरखेडा, चौंढाळा व चिंचाळा या तिन गावांच्या टँकरसाठी तीन विहीरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.

सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ग्रहीत धरून टँकर सुरू करण्यात आले. परंतु सदर टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर नागरिकांची तहान भागत नाही. प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी मिळण्यासा ठी तब्बल दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो, त्यामुळे टँकर वाढविण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थ व सरपंचातून होत आहे.

टँकरच्या पाण्यावर तहान भागत नसल्याने पाचोड - पैठण रस्त्यावरील प्रत्येक ठिकाणी जालना पाणीपुरवठा पाईपलाईनच्या गळक्या 'व्हॉल्व'वर नागरिक पाणी भरतात तर कुणी शेतातून बैलगाडी, सायकलीला कॅन बसवून पाणी आणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT