वंजारवाडी (ता. गेवराई) - येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विहिरीतून पाणी शेंदण्यासाठी ग्रामस्थांची झालेली गर्दी.
वंजारवाडी (ता. गेवराई) - येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विहिरीतून पाणी शेंदण्यासाठी ग्रामस्थांची झालेली गर्दी. 
मराठवाडा

उरलेसुरले पाणी शेंदण्यासाठी गर्दी

वैजिनाथ जाधव

गेवराई - तालुक्‍यात उष्णतेचा पारा वाढत असून रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्यामुळे वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शासकीय पाणीपुरवठा करणारे टॅंकर पाणी नसल्यामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिक आर्थिक भुर्दंड सहन करीत आहेत.

दिवसेंदिवस वाढत चाललेला उन्हाचा पारा व भीषण पाणीटंचाई यामुळे सर्वच नागरिक नाहक त्रास सहन करीत आहेत. तालुक्‍यातील जाणाऱ्या गोदावरी पात्रामुळे तालुक्‍याचा पाणीप्रश्न सध्यातरी मार्गी लागत आहे; परंतु पैठण येथून सोडण्यात येणारे पाणी सहा दिवसांपासून बंद असल्यामुळे गोदावरी पात्र कोरडेठक पडले आहे. यामुळे नगरपरिषद गेवराईचा उद्भव असलेली पाण्याची टाकी कोरडी पडल्यामुळे तालुक्‍यात टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. यामुळे तालुक्‍यातील नागरिक खासगी टॅंकरद्वारे पाणी विकत घेत तहान भागवत आहेत. शासकीय पाणीपुरवठा करणारे टॅंकर गावात येताच सर्वाजनिक विहिरीवर पाणी शेंदण्यासाठी महिला, पुरुष व लहान मुले यांची गर्दी होत आहे. परिणामी जिवाची कदर न करता पाण्यासाठी नागरिकांची विहिरीवर एकच झुंबड दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT