korona 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यातील आठवडे बाजारात शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ (जि. हिंगोली): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्‍हणून जिल्‍हा प्रशासनाने आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. येथे गुरुवारी (ता.१९) भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याने बाजारात शुकशुकाट जाणवत होता. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारचा आठवडे बाजार भरणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

 परिसरातील चाळीस ते पन्नास गावांतील ग्राहक व विक्रेते आठवडे बाजारामध्ये येतात. सकाळी गावातील भाजीविक्रेते बाजारामध्ये आले होते. या विक्रेत्यांना पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगराध्यक्षा विजयमाला मुळे, अविनाश गायकवाड, राम मुळे, अनिल नागरे, विष्णू रणखांबे, महादेव बळवंते, उत्तम जाधव, हरिहर गवळी, विजय महामुने यांनी कोरोनाबाबत जनजागृती केली. त्यानंतर ग्राहक व विक्रेत्यांना (ता.३१) पर्यंत औंढा नागनाथ येथील आठवडे बाजारमध्ये येऊ नये, असे नगर पंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले. 

हट्टा येथे विक्रेत्यांची गैरसोय

हट्टा: वसमत तालुक्‍यातील हट्टा येथे दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार भरलाच नाही. या बाबत प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयास बाजार बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. कोरोनाच्या खबरदारीसाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी खरदारी म्‍हणून प्रशासनाने गर्दीचे ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्‍याप्रमाणे हट्टा येथे भरणारा आठवडे बाजार बंदचे आदेश दिले होते. मात्र, येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना याची कल्‍पना मिळाली नसल्याने सकाळीच अनेक जण नेहमी प्रमाणे आले होते. त्‍यांना ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासनाने कोरोनामुळे बाजार बंद असल्याचे सांगितल्यानंतर विक्रेत्यांनी गावात फिरून पालेभाज्यांची विक्री केली.

बोल्‍डा आठवडे बाजार राहणार बंद

पोतरा: कळमनुरी तालुक्‍यातील बोल्‍डा येथे दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार शुक्रवारी (ता. २०) बंद ठेवण्याच्या सूचना जिल्‍हा प्रशासनाने येहळेगाव ग्रामपंचायतला दिल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळावी, यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांनी या बाबत येहळेगाव गवळी ग्रामपंचायत कार्यालयास पत्र पाठविले आहे. त्यानुषंगाने बाजाराच्या ठिकाणी तसेच परिसरातील गावात याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शुक्रवारी बाजार भरणार नसल्याची माहिती येहळेगाव गवळीचे सरपंच शेख कौसर यांनी दिली. बोल्‍डा असोला, पोतरा, म्‍हैसगव्हाण, सिंदगी, पांगरा शिंदे आदी गावांसह विविध व्यापाऱ्यांना त्‍यांच्या मोबाइवर माहिती पाठविण्यात आली आहे. कोरोनाची खबरदारी म्‍हणून पुढील आदेश येईपर्यंत बाजार बंद राहणार असल्याचे शेख कौसर यांनी सांगितले.

जवळा बुद्रुकचा शुक्रवारचा आठवडे बाजार बंद

जवळा बुद्रुक : सेनगाव तालुक्‍यातील जवळा बुद्रुक येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार भरणार नसल्याचे ग्रामपंचायतर्फे माहिती दिली जात आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाजार बंद करण्यात येणार असल्याचे आदेश प्राप्त झाल्याने आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

Marathi Live News update: भोंदूगिरीच्या आड काळ्या पैशांचा खेळ उघड, अशोक खरात प्रकरणात कोट्यवधींची जप्ती

Satara Rain: सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वाई-जावळी परिसरातही मुसळधार पाऊस, वाहनधारकांची तारांबळ, रस्ते जलमय..

IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षण का द्यावे? सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्याने चर्चा; OBC, SC-ST आणि EWS आरक्षणाचे नियम काय?

SCROLL FOR NEXT