सक्करवाडी (ता. परंडा) ः परतीच्या पावसामुळे तुडुंब भरलेली विहीर.
सक्करवाडी (ता. परंडा) ः परतीच्या पावसामुळे तुडुंब भरलेली विहीर.  
मराठवाडा

परतीच्या पावसामुळे विहीर तुडुंब

सकाळ वृत्तसेवा

अनाळा (जि. उस्मानाबाद) : परतीच्या पावसामुळे सक्करवाडी (ता. परंडा) येथे नाले, ओढे, विहिरी तुडुंब भरल्या आहेत.


सक्करवाडी गाव परंडा तालुक्‍याचे शेवटचे टोक असून अतिदुर्गम भागात हे गाव वसलेले आहे. सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षांत श्रमदानातून माती बांध, दगडी बांध, शेततळी, नाला खोलीकरण, सरळीकरणाची कामे गावात केली होती. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कामे दोन वर्षांपासून पावसाची वाट पाहत होते.

ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गावात झालेल्या कामाची किंमत ग्रामस्थांना कळू लागली आहे. गावातील विहिरी, कूपनलिकांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. शेततळे, नाले तुडुंब भरली आहेत. सक्करवाडी येथे आतापर्यंत 700 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या गावाची लोकसंख्या 670 असून, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामांद्वारे गावाचा विकास ग्रामस्थांनी साधला आहे. परतीच्या पावसाने गावातील कापूस, मका, बाजरी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने तलाठी मोनिका मसगुडे यांनी केले आहेत. 

परतीच्या पावसाने ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरल्याने पाणीप्रश्‍न मिटला आहे; तसेच ऊसलागवडीसाठी मोठा फायदा होणार आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या कामाचे चीज झाल्याने समाधान आहे. पिकांचे झालेल्या नुकसानीबद्दल शासनाने लवकर मदत करावी. 
- सिद्धेश्वर चव्हाण, सक्करवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT