corona-test.jpg 
मराठवाडा

महानगरातून आलेल्यांना काय करावे लागणार.....वाचा म्हणजे कळेल

कृष्णा जोमेगावकर

नांदेड  : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. यानुसार मागील काही दिवसांत पुणे, मुंबई, हैदराबाद किंवा इतर महानगरांमधून नांदेडला आलेल्या नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार आहेत. ग्रामीण भागातही आलेल्या नागरिकांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी करणार आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश जारी
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा ता. १३ मार्चपासून लागू करून करून खंड दोन, तीन व चारमधील तरतुदीनुसार ता. १४ मार्चपासून अधिसूचना निर्गमित केली आहे. या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. 

उपाय योजनांची अंमलबजावणी
शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह इतर विभागप्रमुखांच्या माध्यमातून जिल्ह्यात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आजपर्यंत वेगवेगळे अठरा आदेश काढून उपाययोजना सुचविल्या आहेत.

महानरातून येणाऱ्यांची तपासणी
जिल्ह्यातून हजारो नागरिक कामाच्या शोधात, तर विद्यार्थी शिक्षणानिमित्त पुणे, मुंबई, औरंगाबाद, हैदराबाद आदी महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात राहतात. या शहरात तेथील प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय जारी केल्यामुळे सर्वांनीच आपल्या गावचा रस्ता धरला. महानगरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्याचा फैलाव होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने बाहेरगावांवरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

नागरिकांनी करावे सहकार्य
नांदेड शहरात महापालिका तसेच अन्य आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी नागरिकांची तपासणी होणार आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाहेरून आलेल्यांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा वर्कर आदींच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बाहेरगावांवरून आलेल्या नागरिकांनीदेखील स्वतःहून माहिती द्यावी, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT