नांदेड महापालिका 
मराठवाडा

नांदेडला सभापती होणार कोण?

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक असून त्याची आपआपल्या परीने ‘फिल्डिंग’ लावणे सुरु आहे. सभापतीपद आपल्यालाच मिळावे, यासाठी इच्छुकांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉँग्रेसचा सभापती होणार हे निश्‍चित असून त्या बाबतचा अंतिम निर्णय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण घेणार आहेत. त्यामुळे त्यांचा काय निर्णय आहे, याची चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा...‘हे’ शहर रोजच हरवतेय धुक्यात - धुकं का पडतंय ते वाचा
  
नांदेड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक येत्या ता. २६ डिसेंबरला होणार आहे. त्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी काढले आहेत. आता सभापतिपदी कोण विराजमान होणार? कुणाला संधी मिळणार? याची चर्चा सुरू झाली असून अनेकांची नावे चर्चेत आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान सभापती फारूख अली यांच्यासह आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन आठपैकी कॉँग्रेसच्या सात सदस्यांची निवड नुकतीच सर्वसाधारण सभेत करण्यात आली. दरम्यान, भाजपचा विरोधी पक्षनेता कोण? हे अजून ठरले नसल्याने स्थायी समितीतील भाजपच्या एक सदस्यांची नियुक्ती राहिली आहे.

कॉँग्रेसला स्पष्ट बहुमत
कॉँग्रेसचे महापालिकेत ८१ पैकी ७३ सदस्य आहेत. त्यामुळे महापालिकेत आणि स्थायी समितीतही जंबो बहुमत असल्याने कॉँग्रेसचाच सभापती होणार, हे निश्चित आहे. स्थायी समितीत सोळा सदस्य असून त्यापैकी कॉँग्रेसचे १५ आणि भाजपचा एक सदस्य आहे. कॉँग्रेसच्या सदस्यांमध्ये अमितसिंह तेहरा, दीपाली मोरे, शबाना बेगम नासेर, बापूराव गजभारे, नागनाथ गड्डम, ज्योती रायबोले, अपर्णा नेरलकर, श्रीनिवास जाधव, फारूख हुसेन, अब्दुल रशिद, पूजा पवळे, राजेश यन्नम, दयानंद वाघमारे, करुणा कोकाटे आणि ज्योती कल्याणकर यांचा समावेश आहे. या १५ सदस्यांपैकी एकाची सभापती म्हणून निवड होणार आहे.

गुरुवारी होणार निवड
औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सभापतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात पत्र पाठविले असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकेत गुरुवारी (ता. २६) सकाळी अकरा वाजता विशेष सभा घेऊन सभापतीपदाची निवड घेण्यास सांगितले आहे. तसेच पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी अमितसिंह तेहरा, दयानंद वाघमारे, पूजा पवळे, राजेश यन्नम, अब्दुल रशीद, फारूख हुसेन आदींची नावे चर्चेत आहेत. शेवटी या बाबतचा निर्णय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे घेणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT