Crime
Crime 
मराठवाडा

शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग

सकाळवृत्तसेवा

खुलताबाद - औरंगाबाद ते गोळेगावदरम्यान (ता. खुलताबाद) खासगी वाहनाने प्रवास करताना दोनजणांनी विवाहित महिलेची छेडछाड, अश्‍लील शेरेबाजी करीत विनयभंग केला. यातील एकजण गोळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून, दुसरा औरंगाबादेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांविरुध्द खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळेगाव (ता. खुलताबाद) येथील रहिवासी असलेली पीडित महिला गावातील एका गरोदर महिलेस बाळंतपणासाठी गुरुवारी (ता. आठ) रात्री खासगी वाहनाने औरंगाबादेतील ‘घाटी’ रुग्णालयात घेऊन गेली. गरोदर महिलेस ‘घाटी’ रुग्णालयात दाखल करून याच वाहनाने पीडित महिला गावी परतत होती. सोबत चालकासह चारजण होते. शरणापूर फाटा ते गोळेगावदरम्यान प्रकाश रामलाल कच्छवाह, सतीश भिकन घोडके (दोघेही रा. गोळेगाव) यांनी पीडित महिलेची छेडछाड करून अश्‍लील शेरेबाजी करीत विनयभंग केला. चालकासह वाहनातील आणखी एकाने या दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी जुमानले नाही. याप्रकरणी पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी रात्रीचा घडलेला प्रकार घरी सांगितला. दरम्यान, पीडित महिलेच्या नातेवाइकांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात जमा होऊन फिर्याद दिली व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

शिक्षकी पेशाला फासला काळिमा
छेडछाड, विनयभंग करणारा प्रकाश कच्छवाह हा गोळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून, दुसरा संशयित आरोपी सतीश घोडके हा औरंगाबाद येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. गावातील महिलेचा गावातीलच या दोनजणांनी विनयभंग केल्याने परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून बुद्धिमान, चारित्र्यवान पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकानेच शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे घृणास्पद कृत्य केले आहे. असे शिक्षक शाळेत नीतिमत्तेचे काय धडे देत असतील, असा प्रश्‍नही विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT