manapa
manapa 
मराठवाडा

टेबल वर्कच्या कामामुळे वसुली लिपीकांना भरली धडकी 

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी वसुली लिपीकांच्या बदल्यांमध्ये प्रभाग समितीच बदलल्यानंतर आता नेहमी फिरतीवर असलेल्या काही वसुली लिपीकांना टेबलवर बसवले आहे. वर्षानुवर्षापासून एकाच ठिकाणी व एकच प्रकारचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठी धडकी भरली असून आता कुठल्या विभाग व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील हे सांगता येत नसल्यामुळे ठाण मांडून असलेले अनेक जण धास्तावले आहेत. 

महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी (ता.१८) सप्टेंबर रोजी शहरातील तीन प्रभाग समित्यांमधील ३२ वसुली लिपीकांच्या प्रभाग समिती बदलून बदल्या केल्या होत्या. अनेक वर्षाच्या खंडानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात व अचानक झालेल्या या बदल्यांमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.

सोमवारी २० कर्मचाऱ्यांच्या बदल्या 
ही खळबळ थांबते न थांबते पुन्हा एकदा श्री. पवार यांनी सोमवारी (ता.२८) वसुली लिपीक, शिपाई आदी २० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यांना अतिरीक्त प्रभार दिला. ३२ वसुली लिपीकांच्या बदल्यांमध्ये दहा वसुली लिपीकांचे वसुली विभाग काढून घेण्यात येऊन त्या ठिकाणी अन्य लिपीकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तर सोमवारी काढलेल्या बदल्यांच्या आदेशात त्या दहा वसुली लिपीकांना आता टेबल देण्यात आले आहेत. त्यांचे फिरणे थांबवून त्यांना एका जागीच बसवले आहे. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्यांना चांगल्या जागी बदल्या करण्यात आलेल्या आहे. 

अश्‍या झाल्या बदल्या 
वसुली लिपीक बी.ए. देशमुख यांची प्रभाग समिती ब मध्ये लिपीक म्हणून, रमेश मोगल यांची मलेरिया, रमेश गुघाणे यांची समिती ब मध्ये, डिगांबर जाधव यांची समिती क, साहेबराव टेकाळे यांची भांडार विभाग, सतिश राऊत यांची आवक जावक, बाबाराव आघाव यांची अभिलेखे अद्यावत करण्यासाठी वसुली विभागात, विठ्ठल सवणे नगररचना विभाग, मुरलीधर समिंद्रे यांची समिती ब मध्ये तर प्रल्हाद डोणे यांची उद्यान विभागात लिपीक म्हणून बदली झाली आहे. 

काहींना अतिरिक्त पदभार 
क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे राजु कामखेडे यांना आता पाणी पुरवठ्याचा अतिरीक्त प्रभार देण्यात आला. तेथील श्री.डावरे हे सेवानिवृत्त होत आहेत. क्षेत्र कार्यकार्ता युवराज साबळे मलेरिया विभागत अतिरीक्त प्रभार, लिपीक नजम खान शहर अभियंता विभाग, शिपाई विशाल उफाडे यांना अधिकचा उपायुक्त-एक यांचा कक्ष, अक्षय अहिरराव यांना उपायुक्त -दोन यांचा अतिरीक्त कामकाज, मजहर अल्लाबक्ष यांनना नगरसचिव विभाग, संगणक विभागातील प्रभारी लिपीक सुमित दरक यांना आरोग्य विभागाच्या अहवाल तयार करण्याचे अतिरीक्त काम, आरोग्य विभागाचे शहर लेखा व्यवस्थापक अमोल काटोके व लेखापाल अमोल सोळंके हे आता मुख्य लेखा अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली, आरोग्य विभागाचे कामकाज पाहतील. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : गुजरातमध्ये भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रता

SCROLL FOR NEXT