Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil Nilangekar 
मराठवाडा

कामगार मंत्र्यांच्या गावात होणार कामगार संमेलन

सुशांत सांगवे
लातूर - "कामगार आहे मी, तळपती तलवार आहे... रोजी रोटीचा सवाल, रोजचाच आहे' अशा वेगवेगळ्या काव्यांतून कामगारांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. आजच्या साहित्यिकांच्या भावना व्यापक पातळीवर व्यक्त व्हाव्यात यासाठी लातूर जिल्ह्यातील निलंग्यात प्रथमच राज्यव्यापी कामगार साहित्य संमेलन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर गावातच अशा प्रकारचे संमेलन होणार आहे. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे.

कामगारांच्या व्यथा-वेदना, त्यांचे जगणे कथा-कादंबऱ्यांतून शब्दबद्ध होत आले आहे. यासाठी झटणाऱ्या लेखक-कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी कामगार साहित्य संमेलन घेण्याचा विचार "मसाप'च्या रविवारी (ता. 15) झालेल्या बैठकीत पुढे आला. या विषयावर लातूरचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, "मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची एकत्रित बैठक येत्या 23 रोजी होणार आहे. त्यात या संमेलनावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते.

उदगीरमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन
कामगार संमेलनाशिवाय मराठवाडा साहित्य परिषदेचे आगामी मराठवाडा साहित्य संमेलन उदगीरमध्ये घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. उदगीर शाखेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी या संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. त्यामुळे या वर्षअखेरीस दोन संमेलनांची पर्वणी लातूरकरांना मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT