Bees-Cluster
Bees-Cluster 
मराठवाडा

झाडावरील मोहळ काढण्यासाठी गेला आणि तिथेच मेला

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : झाडावर मोहळ हुलविण्यासाठी गेलेल्या तरुणावर आक्रमक झालेल्या मधमाशांनी जोरदार हल्ला चढविल्याने तो तरूण गंभीर जखमी झाला. मधमाशांच्या तावडीतून वेळीच बाहेर न पडल्याने त्या तरूणाचा झाडावरच मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव (ता. सोयगाव) शिवारात सोमवारी (ता.26) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गोंदेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

गोंदेगाव येथील मुकेश सिकंदर तडवी (वय 35) हा शेतातील गट क्र. 29 मध्ये फिरत होता. त्यावेळी त्याला निंबाच्या झाडावरील दाट फांद्यात असलेल्या मधाचे पोळे दिसले. त्या पोळ्यावर डाव मारण्यासाठी तो झाडावर चढला, परंतु त्याचा डावपेच हुकल्याने चवताळलेल्या मधमाशांच्या तावडीत सापडल्याने आक्रमक मधमाशांनी त्याच्या तोंडावर, डोळ्यावर आणि सर्व उघड्या अंगावर चावा घेतला. मधमाशांनी डंक मारल्याने तो गंभीर जखमी झाला. मधमाशांनी त्याचा बराच वेळ चावा घेतल्याने अखेरीस मृतावस्थेत तो खाली पडला.

ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तातडीने पुढील उपचारासाठी त्यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तेथेच मृत घोषित केले. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक सीताराम म्हेत्रे पुढील तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT