Help
Help 
मराठवाडा

आदित्यच्या उपचारासाठी ‘युगंधर’तर्फे सव्वालाख, मदतीसाठी सरसावले शेकडो हात

संजय राऊत

टेंभुर्णी (जि.जालना) : विजेचा धक्का लागून हात गमवावा लागलेल्या घाणखेडा (ता. जाफराबाद) येथील आदित्य रगड या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी ‘युगंधर प्रतिष्ठान’च्या माध्यमातून १ लाख ३५ हजारांची मदत करण्यात आली. सदर मदतीच्या रकमेचा धनादेश आदित्यवर उपचार सुरू असलेल्या बेंबडे हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे रविवारी सुपूर्द करण्यात आला.


घाणखेडा येथील आदित्य ज्ञानेश्वर रगड या ११ वर्षीय बालकाने विद्युत प्रवाह असणाऱ्या मुख्य तारांना स्पर्श केल्याने त्याला जोरदार धक्का लागला होता. त्याचा हात काढावा लागणार असल्याने संपूर्ण शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी दहा लाखांचा खर्च सांगण्यात आला होता. सदर शस्त्रक्रिया राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये बसत नसल्याने हा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत आदित्यचे पालक होते. घरची परिस्थिती बेताची, अवघी दोन एकर जमीन आणि मुलाची शस्त्रक्रिया या विवंचनेत कुटुंबीय होते.

गरजू आणि गोरगरीब रुग्णांना अडचणीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात देणाऱ्या टेंभुर्णी येथील ‘युगंधर प्रतिष्ठान’ने आदित्यच्या मदतीसाठी पुढाकार घेत आवाहन केले होते. तालुक्यासह जिल्ह्यातील आणि मुबई, पुणे या जिल्ह्यांबाहेरील सर्वच क्षेत्रांतील मंडळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अवघ्या ३ दिवसांत १ लाख ३५ हजारांची मदत संकलित झाली होती. रविवारी सदर रकमेचा धनादेश बेंबडे हॉस्पिटलकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ‘युगंधर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विनोद कळंबे, उपाध्यक्ष अल्ताफ शेख, सचिव धनंजय मुळे, राजीव पिंपळे, सुधाकर चिंधोटे, सैनिक गजानन काळे, ज्ञानेश चव्हाण, ज्ञानेश्वर रगड आदी उपस्थित होते.


‘युगंधर प्रतिष्ठान’च्या माध्यमातून माझ्या मुलाच्या उपचारासाठी मिळालेली मदत ही खूप महत्त्वाची असून, आमच्या कुटुंबावरील या संकटात शेकडो हात पुढे आल्याने गहिवरून आले आहे. यापुढील काळात मी आणि माझे कुटुंबदेखील कुणाही गरजूच्या मदतीसाठी फूल न फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचा प्रयत्न करू.
- ज्ञानेश्वर रगड, आदित्यचे वडील, घाणखेडा


गरजू, गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी ‘युगंधर प्रतिष्ठान’ने कायम पुढाकार घेतला असून, यापूर्वीही अपघातात अपंगत्व आलेले, दुर्धर आजाराने पीडित, कुटुंबप्रमुख गमावलेल्या कुटुंबास आर्थिक मदत युगंधर टीम आणि पारदर्शक व्यवहारामुळे तिच्या आवाहनाला कायम भरघोस प्रतिसाद देणाऱ्या दात्यांनी केली आहे. टेंभुर्णीसारख्या गावातून ही चळवळ उभी राहिल्याचा आनंद वाटतो.
गजानन काळे, माजी सैनिक


(संपादन - गणेश पिटेकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT