मुक्तपीठ

संस्कार पाऊले

प्रा. डॉ. सदाशिव भोसले

शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून शिक्षण या विचाराने अवघे मानवजीवन प्रफुल्लित व्हावे, असे सर्वांनाच वाटते. जे जपण्यासाठी आपण आपले सणवार, उत्सव उत्साहाने साजरे करत असतो. अलीकडेच आपण दसरा-दिवाळी साजरी केली. नात्यांची वीण घट्ट करणारी ही सणावळी निश्‍चितच हवी हवीशी वाटते. संस्काराचे अनेक पैलू, प्रसंग प्रपंचामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे मन पावन होते. वसुबारस ते भाऊबीज प्रत्येकाचे अंगण आकाशकंदील, रोषणाई, रांगोळी इ.ने सजलेले असते. माझ्या पत्नीने दिवाळीत दररोज नवनवी, रंगबीरंगी व आकर्षक, मनोहारी रांगोळ्या रेखाटल्या. शेजारच्या आट-दहा वर्षांच्या मुली ती रांगोळी पाहण्यास दररोज यायच्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही भारावून जायचो. त्या मुली रांगोळी पाहायच्या, पण त्याला हाताचा स्पर्श करत नसत आणि आपले पाय लागू नयेत म्हणून काळजी घेत असत.

त्या मुली म्हणाल्या, ‘‘काका, काकांनी रांगोळी छान काढली आहे. आम्हाला खूप आवडली. आम्ही काकींसारखीच रांगोळी काढायला शिकणार आहोत.’’ ही रांगोळी कशी काढायची ते आम्हाला शिकवतील काय?

मी म्हणालो, ‘‘त्यात काय अवघड आहे? ती रांगोळी काढायला लागली की मी तुम्हाला बोलवीन, तेव्हा या.’’

मुली ‘हो’ म्हणाल्या. त्या मुली दररोज सकाळी माझी पत्नी रांगोळी काढायला सुरवात करण्यापूर्वीच हजर व्हायच्या. रांगोळी पूर्ण होईपर्यंत निरीक्षण करायच्या आणि त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून व्हायचा. ‘काका, आम्ही ठिपके जोडायचे करते, त्यात रंग कसे भरायचे असतात ते आम्ही पाहिले ते कधीही विसरणार नाही. आम्ही अशा रांगोळ्या काढायला शिकणारच!’ मुलींचा हा आशावाद मला खूप काही सांगून गेला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT