muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

चहाबाज पुणे

अनिता घाडगे

पुण्यात चहा अटळ आहे. म्हणून कित्येकदा ‘चहाटळ’ हे विशेषण पुणेकरांना लावले जाते. पुण्याचा हा चहाबाजपणा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपांत समोर येतो.

थोड्याच दिवसांत ‘चहाबाज पुणेकर’ अशी पुणेकरांची ओळख निर्माण झाली, तर त्यात नवल वाटायला नको एवढा ‘अमृततुल्य’चा सुळसुळाट झाला आहे. अचानकपणे एवढे चहाचे पेव कसे काय फुटले बुवा! जिकडे बघावे तिकडे अमृततुल्य. प्रत्येकाची ‘टॅगलाइन’ तेवढी वेगळी, पण शेवटी तो चहाच! ‘आमच्या चहाने ॲसिडिटी होत नाही’, ‘तल्लफ भागविणारा चहा’, ‘प्रेमात पाडणारा चहा’ अशा एक ना अनेक. त्याचबरोबर बासुंदी चहा, गुळाचा चहा, केमिकलविरहित चहा असेही अनेक प्रकार. माझ्यासारख्या अनेकांनी मोठ्या मुश्‍किलीने वर्षानुवर्षे जपलेल्या चहाच्या सवयीला कसेतरी सोडले आणि ग्रीन-टी, ब्लॅक-टी, लेमन-टी, काव्हा-टी, हर्बल-टी यांसारख्या चहांची सवय करून घेतली आहे. या चहाची सवय लागते न लागते तोच हे अमृततुल्यवाले भुलवू लागले. कित्येक तरुण मुलां-मुलींनी त्यांचा ट्रेंड चेंज करून इकडे अड्डा जमवताना दिसू लागले आहेत. वडापाव, सामोसा किंवा कुठल्याही स्नॅकनंतर आता चहा ‘मस्ट’ झाला आहे.

आपल्याकडे अचानक कशाला महत्त्व येईल सांगता येत नाही. मध्यंतरी झटका मिसळ, चटका मिसळ, तडका मिसळ, तंदुरी मिसळ, चुलीवरची मिसळ असे मिसळीचे अनेक प्रकार सगळीकडे बघावयास मिळत होते. वडापावची क्रेझ तर आपल्याकडे नेहमीचीच. पण अचानक हे चहाचे पेव कुठून फुटले हे काही कळायला मार्ग नाही. सगळे जग आणि डॉक्‍टरसुद्धा, चहा कसा आरोग्यास वाईट आहे, चहाचे दुष्परिणाम काय काय आहेत हे सांगत असताना, ते जणू लोकांना पटत असतानाच दुसरीकडे हे चहावेड तितक्‍याच वेगाने जोर धरू लागले आहे. आता नक्की कुठला चहा घ्यावा? म्हणजे बासुंदी चहा, गुळाचा चहा की ॲसिडिटी न होणारा प्रेमाचा चहा, कुठल्या तरी गावाचा ब्रँड झालेला चहा, तल्लफ घालविणारा की आरोग्यदायी ग्रीन-टी, ब्लॅक-टी, लेमन-टी?

माझ्यासारखेच तुम्हीही या द्विधा मनःस्थितीत अडकला असाल ना? चहाटळ कुठचे! सॉरी, आय मीन चहाबाज कुठचे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT