Shubhangi-Sant
Shubhangi-Sant 
मुक्तपीठ

सततोद्योगी

शुभांगी संत

जगण्याचा कंटाळा असा त्यांना नसतोच, त्या सतत सेवेत रमलेल्या असतात.

नव्वदीत असूनही माझ्या मैत्रिणीचे हात कधीही स्वस्थ बसत नाहीत. नलिनीआक्का फडणीस म्हणजे हसरा चेहरा नि गोड बोलणे. आक्कांनी समर्थ रामदासांच्या म्हणण्याप्रमाणे संसार करावा नेटका तर केलाच, पण बरोबर परमार्थही साधला. पूर्वी हिंदीच्या परीक्षांना महत्त्व होते. त्या स्वतः कोविद परीक्षेला बसल्याच आणि इतरही अनेकींना परीक्षेला बसविले.

त्यासाठी वर्ग घेतला. पंधरा वर्षे यजमानाच्या बरोबरीने नाटकात सुंदर कामे केली. बोरिवली येथील रिझर्व्ह बॅंक महिला मंडळाच्या खजिनदार म्हणून अनेक वर्षे काम केले. घरातील जबाबदाऱ्या होत्याच, पण त्याही हसतमुखाने पार पाडल्या. शिवथर घळ येथे सतत पंचवीस वर्षे सेवेला गेल्या. घळीतील शिबिरे, उत्सव, प्रवचने या सर्वांना आक्कांची हजेरी लागायची. सज्जनगडला जाताना पाचशे पिशव्या हाताने शिवून घेऊन गेल्या. गोंदवल्याला उत्सवाच्या वेळी हजर असायच्या.

पुण्यात आल्यानंतर हिंगणे महिला शिक्षण संस्था येथे वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना शिकवायला संगीता गाडगीळ यांच्याबरोबर जायच्या. सुटीत त्यांची शिबिरे घेत. त्या विद्यार्थिनींना वेगवेगळ्या परीक्षेला बसवत. त्यांचे पेपर तपासत. ज्ञानदान व सेवा हे त्यांचे आवडते काम. कॉलनीतही अनेक वर्षे सकाळी मुलांना शिकवण्याचे काम त्यांनी मनापासून केले.

घरातही त्यांचे हात सतत चालतच असत. दारावर लावायची तोरणे करून सर्वांना देत असत. क्रोशाच्या सुईने लोकरीने आसन करून शिवथर घळ, सज्जनगड, गोंदवले येथे जाताना आठवणीने घेऊन योग्य त्या व्यक्तींना देत असत. नुसते बसून राहाणे हे त्यांच्या स्वभावातच नाही. वाती वळणे, गव्हल्या करणे आणि मैत्रिणींना देणे चालूच असते. हे सर्व करताना काही विशेष करतो आहोत हा भाव मुळीच नसतो. लहान-मोठ्या आकाराच्या कापडाच्या पिशव्या त्या शिवतात. कामगार वस्तीतील मुलांजवळ जाऊन, तसेच कष्टकरी स्त्रियांना त्या जवळ जाऊन आपुलकीने पिशव्या देतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT