file photo
file photo 
मुंबई

मुंबईतील १६ पुलांची लवकरच दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने धोकादायक १६ पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील २९ पैकी १६ धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिका १४ कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबईतील पादचारी आणि रेल्वे पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटनंतर २९ पूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यानंतर अनेक पुलांची दुरुस्ती सुचवण्यात आली. काही पुलांवरील वाढलेला भार कमी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार महापालिका १६ पुलांची दुरुस्ती करणार आहे. अंधेरीतील गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि हिमालय पूल दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. दोन्ही दुर्घटनांनंतर महापालिकेने आयआयटी मुंबई आणि तज्ज्ञांच्या मदतीने शहरातील पादचारी आणि रेल्वे पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्यानुसार २६ पूल अतिधोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यामुळे २९ पैकी आठ पूल पाडण्यात आले. १२ पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

काही पुलांचे काम पावसाळ्यानंतर, ऑक्‍टोबरपासून सुरू केले जाणार आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिटदरम्यान अनेक पुलांवर जास्त भार असल्याचे समोर आले. त्या पुलांवरील भार कमी करण्याची सूचना अहवालात करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने १६ पुलांवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे दोन प्रस्ताव महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आले आहेत.

असे होणार काम
पुलांच्या पृष्ठभागाची मास्टिक अस्फाल्टने (डांबरचा थर) डागडुजी केली जाईल. रेल्वे पुलांवरील मार्गिकेचा थर पूर्णपणे काढून मास्टिक अस्फाल्टचे थर टाकले जातील. त्यासाठी महापालिका शाह आणि पारीख कंत्राटदार कंपनीला १४ कोटी ४० लाख रुपये देणार आहे. पावसाळा धरून नऊ महिन्यांत १६ पुलांवरील भार कमी करण्याची अट कंपनीला घालण्यात आली आहे.

मजबुतीकरण होणारे पूल
बेलासिस रेल्वे पूल, डायना रेल्वे पूल, फ्रेंच पूल, ग्रॅँट रोड पूल, केनेडी पूल, सॅण्डहर्स्ट पूल, भायखळा रेल्वे पूल, प्रिन्सेस स्ट्रीट पूल, महालक्ष्मी रेल्वे पूल, प्रभादेवी स्थानकातील कॅरोल पूल (एल्फिन्स्टन), चिंचपोकळी स्थानकाच्या उत्तरेकडील पूल, करी रोड स्थानकाच्या उत्तरेकडील रेल्वे पूल, वडाळा स्थानकाजवळील नाना फडणवीस पूल, जीटीबी नगर रेल्वे पूल, माटुंगा पश्‍चिम स्थानकाजवळील टी. एच. कटारिया पूल, दादरमधील मध्य व पश्‍चिम रेल्वेवरील टिळक पूल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT