mumbai
mumbai 
मुंबई

दुर्घटना, मृत्यू, चौकशी, कारवाई... मग पुन्हा दुर्घटना... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांत प्रशासकीय बेफिकिरीमुळे घडलेल्या दुर्घटना प्रकरणांत आजवर एकाही अधिकाऱ्यास कारावासाची शिक्षा झालेली नाही. ही प्रकरणे केवळ चौकशा, निलंबनासारख्या तत्कालीन कारवाया आणि तारखांत अडकलेले खटले याच पायऱ्यांवर रेंगाळताना दिसलेली असून, त्यामुळे प्रशासनाचा कारभार वचकहीन झाला असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या अशा गैरकारभारामुळेच आज मुंबईकर घराबाहेर पडतो तो जीव मुठीत घेऊनच. 

मुंबईतील गेल्या काही वर्षांतील दुर्घटना आणि त्यानंतर झालेल्या कारवायांवर ही एक नजर... आपली दृष्टी उघडण्यासाठी.... 

26 सप्टेंबर 2013 : डॉकयार्ड - बाबू गेनू मंडईची निवासी इमारत कोसळून 61 जणांचा मृत्यू 
- या इमारतीच्या दुरुस्तीची फाईल एक-दीड वर्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या टेबलावरच 
- काही अधिकाऱ्यांचे निलंबन आणि अटक 
- वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही 
- उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात 

18 जुलै 2014 : अंधेरी-लोटस बिझनेस पार्क या इमारतीत आग. अग्निशमन जवानाचा मृत्यू 
- इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणेच्या अनेक त्रुटी होत्या. त्यानंतर पुन्हा बहुमजली इमारतींची तपासणी सुरू करण्यात आली. 

9 मे 2015 : काळबादेवी - गोकुळ निवास इमारतीला आग. अग्निशमन दलाचे तत्कालीन प्रमुख सुनील नेसरीकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांचा मृत्यू 
- इमारतीत बेकायदा सोने गाळण्याचे आणि दागिने बनवण्याचे कारखाने 
- दुर्घटनेनंतर पालिकेकडून अग्निशमन दलासाठी कार्यप्रणाली (एसओपी) तयार 


16 ऑक्‍टोबर 2015 : कुर्ला - उपहारगृहाला आग. आठ जणांचा मृत्यू 
- उपहारगृहात सिलेंडरमधील गॅस लांब पाईपने जोडून शेगडीपर्यंत आणण्यात येत होते. 
- प्रभाग कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्यांसह दोन आरोग्य निरीक्षक निलंबित 
- यानंतर उपहारगृहांची तपासणी सुरू 

29 सप्टेंबर 2017 : एल्फिन्स्टन रेल्वेस्थानक - पादचारी पुलावर चेंगराचेंगरी. 23 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी 
- यानंतर परळ टर्मिनसचे काम सुरू करण्याबरोबरच दोन्ही स्थानकांना जोडणारा नवा पूल बांधला. 
- प्रत्यक्षात हा पूल काही वर्षांपूर्वीच होणे गरजेचे होते. 

 28-29 डिसेंबर 2017 : कमला मिल कम्पाऊंड - दोन उपहारगृहांना आग. 14 मृत्यू, 28 जखमी 
- एका अग्निशमन अधिकाऱ्यासह पालिकेचे दोन अधिकारी निलंबित 
- अग्निसुरक्षेसाठी पालिकेचे विभाग स्तरावर विशेष पथक 

3 जुलै 2018 : अंधेरी - गोखले पूल कोसळून तीन जणांचा मृत्यू 
- यानंतर रेल्वेकडून पुलांची तपासणी सुरू 
- मात्र, पालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या हद्दीच्या वादात अनेक धोकादायक पुलांची दुरुस्ती रखडली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT