मुंबई

बेकायदा स्कूल व्हॅनवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेकायदा आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. परवानाधारकांकडूनही स्कूल बसच्या सुरक्षा नियमांचा भंग केला जात असल्याच्या तक्रारी पालकांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे केल्या आहेत. त्यानुसार 10 डिसेंबरपर्यंत स्कूल बसची विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) स्कूल बसना परवानगी दिली असून, सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम आखून दिले आहेत; परंतु परवानाधारकांकडूनच या नियमांची पायमल्ली होत आहे. परवानगी नसतानाही अन्य वाहनांमधून विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक केली जात आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

राज्यातील प्रत्येक आरटीओ विभागात विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनचालकाचा परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली जाईल. त्याचप्रमाणे आरटीओ अधिकाऱ्यांनी आखून दिलेल्या नियमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. 

आवश्‍यक यंत्रणा 

स्कूल बसमध्ये धोक्‍याचा इशारा देण्यासाठी पॅनिक बटन, आपत्कालीन दरवाजा, शालेय प्रयोजनासाठीच वाहन वापरण्यात येत असल्याचे दर्शवणारे विद्यार्थ्यांचे चित्र, अंतर्गत आसनव्यवस्था, प्रथमोपचार पेटी, बसमध्ये चढण्यासाठी खालची पायरी, दप्तर ठेवण्याची जागा, अग्निशमन उपकरण, आसनाच्या बाजूला हॅंडल, आसनाच्या वरील बाजूला, मागील बाजूला, उभे राहिल्यावर आधार घेण्यासाठी हॅंडल, खिडकीच्या बाहेरील बाजूला आडवे बार. 

रिक्षांवरही कारवाई 

परवानगी नसतानाही रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. फक्त तीन प्रवाशांची परवानगी असताना रिक्षात त्याहून कितीतरी जास्त विद्यार्थ्यांना कोंबले जाते. अशा रिक्षा दिसल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

न्यायालयाच्या निर्णयानुसार अनधिकृत स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली जात आहे. अवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. ही मोहीम 10 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. 
- शेखर चन्ने, राज्य परिवहन आयुक्त 

web title : Action on illegal school van

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT