करिअरमध्ये चांगल्या दिग्दर्शकांची साथ लाभली : शर्मिला टागोर 
करिअरमध्ये चांगल्या दिग्दर्शकांची साथ लाभली : शर्मिला टागोर  
मुंबई

करिअरमध्ये चांगल्या दिग्दर्शकांची साथ लाभली : शर्मिला टागोर 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चित्रपटसृष्टीत काम करत असताना मला चांगल्या दिग्दर्शकांची साथ मिळाली. मी अभिनेत्री म्हणून घडत गेले. अनेक सन्मान मिळाले; त्यामुळे मी फार खूष आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी 10 व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यात व्यक्त केली. 

चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना विशेष पुरस्कार प्रदान केला. त्याबद्दल त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे आभार मानले. "सामना', "सिंहासन' हे मराठी चित्रपट पाहताना मंत्रालयातच असल्याचा भास होतो. "जैत रे जैत', "उंबरठा' हे मराठी चित्रपट तर कमालीचे आहेत. हे सारे मराठी चित्रपट जब्बार पटेल यांच्यासारख्या अभ्यासू आणि प्रतिभावंत भारतीय दिग्दर्शकाने चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांच्या या चित्रपटांमुळे मराठी चित्रपट जगभरात गेला आहे, असे गौरवोद्‌गार सुप्रिया सुळे यांनी काढले. 

चित्रपट महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी या महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस शरद काळे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात 23 जानेवारीपर्यंत सुमारे 65 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. भारत, चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्राईल, तुर्कस्तान आदी देशांतील चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT