divyanshu
divyanshu 
मुंबई

17 तासांनंतरही बेपत्ता बाळाचा शोध घेण्यात अपयश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गोरेगाव पूर्व आंबेडकर नगर मधील दीड वर्षीय दिव्यांश सिंग हे लहान बाळ घरा जवळील नाल्यात पडून वाहत गेल्याची दुर्दैवी घडून 17 तासापेक्षा अधिक तास झाले तरी हे बेपत्ता बाळ बचावकार्य करणाऱ्या यंत्रणांना सापडलेलं नाही.अग्निशमन दल,पोलीस विभाग आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाथकाने 10 किलो मीटर परिसरातील नाले पिंजून काढले असले तरी बेपत्ता बाळ अद्याप या यंत्रणांच्या हाती लागलेलं नाही.

बुधवारी रात्री साडे नऊच्या च्या सुमारास आपल्या आई-वडील आणि दोन भावंडांसह राहणारा दिव्यांश धानसी हे दीड वर्षीय बालक आपल्या घराबाहेर खेळत असतांना अचानक बेपत्ता झाला.घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेच निळून न आल्याने रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासले.सीसीटीव्हीमध्ये दिव्यांश चाळीतून चालत चालत बाहेरील रस्त्यावर आला आणि रस्त्याजवळील उघड्या नाल्यात पडला असल्याचं स्पष्ट झालं.

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या आसपास अनेक उघडे नाले आहेत.पावसामुळे नाल्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने दिव्यांश पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बेपत्ता झाला.त्याच्या घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड करत दिव्यांशचा नाल्यात उतरून शोध घेतला पण दिव्यांश सापडला नाही.या घटनेची माहिती मिळताच पोलीस,अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी यांचं पथक घटना स्थळी दाखल होऊन त्यांनी रात्रभर या नाल्यात दिव्यांशचा शोध घेतला मात्र तो अद्याप सापडलेला नसून त्याला शोधण्याचा प्रयत्न अद्याप सुरू आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT