अमृतांजन पूल.
अमृतांजन पूल. 
मुंबई

अमृतांजन पूल पाडण्यास खोपोलीत विरोध

सकाळ वृत्तसेवा

खोपोली (बातमीदार) : अमृतांजन पुलामुळे मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस- वेवरील वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने हा पूल पाडण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नव्याने सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर व नगरसेवक मनेश यादव यांनी रस्ते विकास महामंडळ व संबंधित खात्याला पूल न पाडण्यासंदर्भात पत्र दिले आहे. खोपोलीतील नागरिक व सर्व राजकीय पक्षांचा सदर पूल पाडण्यास विरोध कायम असल्याचे दर्शवित वाहतूक सुरळीत करण्यासाठी अन्य पर्यायांवर विचार करण्याची विनंती संबंधित खात्याला मसूरकर यांनी केली आहे.

दरम्यान, रस्ते विकास महामंडळाकडून सदर पूल पाडण्याबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार २४ जुलै २०१८ पर्यंत नागरिकांनी व विविध संघटना व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी सूचना दिल्या आहेत. त्याचे काय, असा प्रश्‍नही उपस्थित पूल पाडण्यास विरोध करणाऱ्यांकडून होत आहे.

हा पूल मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरत असल्यामुळे, तो पाडून व त्या ठिकाणची वळणे काढून रस्ता सरळ झाल्यास महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व अपघात दोन्ही कमी होतील, असे रस्ते विकास महामंडळाचे म्हणणे आहे. मात्र सदरचा पूल हा रेल्वेच्या ताब्यात असल्याने याबाबत रेल्वे प्रशासनाबरोबरही पत्रव्यवहार करावा लागणार आहे. याबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार दत्ताजी मसूरकर यांनी रस्ते विकास महामंडळ व या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन, अमृतांजन पुलामुळे वाहतूक कोंडीस अडथळा निर्माण होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सदर पूल पाडल्यास दस्तुरी परिसरात असलेल्या धनगर व कोळी समाजाच्या वस्तीतील नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे अधोरेखित केले आहे. या सर्व संभाव्य गैरसोयी व पुलाचा ऐतिहासिक वारसा यांचा विचार होण्याची गरज असल्याने मसूरकर यांनी पुलाची डागडुजी करावी, अशी मागणी केली आहे. 

भुयारी रस्त्याचे काम प्रगतिपथावर
खालापूर टोल नाका ते लोणावळा सिंहगड कॉलेजदरम्यान नवीन पर्यायी भुयारी रस्ता बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी पाच हजार कोटी निधीची तरतूद होऊन, याबाबत तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित कामाची पाहणी करून कामही सुरू झाले आहे. 

ऐतिहासिक पूल
खंडाळा घाटात इंग्रज अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी मेजर जनरल जॉन्स मालकोलम जीसीई अनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली १८३० मध्ये खंडाळा घाटातील दस्तुरी गावाजवळ या पुलाची उभारणी केली असल्याची कोणशीला आजही पुलाच्या वारशाची साक्ष देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT