Mumbai
Mumbai 
मुंबई

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर ओला, उबर विरोधात 'रेल्वे रोको'

सकाळवृत्तसेवा

मुंबई : विधिमंडळ संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ओला, उबर विरोधातील चालक, मालकांचे प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्याच्या आश्वासनांनंतर संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. मात्र आज (ता. 20) रोजी सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान दादर येथे पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या फलाटावर चालक, मालकांनी रेल्वे रोको केला. दरम्यान काहीवेळासाठी लोकल विस्कळीत झाली होती.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
ओला, उबर चालक, मालकांनी सोमवारी (ता.19) रोजी आझाद मैदानात मोर्चा काढून, संबंधित शिष्ठमंडळाने विधिमंडळात जाऊन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर यावर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर चालक, मालकांनी संप तात्पुरता स्थगित करण्यात आला. मात्र आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास दादर पश्चिम रेल्वे मार्गावर दलित पँथरचे भाऊ जाधव यांनी ओला, उबर चालक, मालकांसह रेल्वे रोको केल्याने, ओला, उबर संघटनांमध्ये फूट दिसून आली.

यावेळी सुमारे 7 मिनिटं लोकल रोखून ठेवण्यात आल्याने, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. दरम्यान रेल्वे पोलिसांनी रेल्वे रोको करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT