मुंबई

बोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप 

वृत्तसंस्था

मुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना आज (गुरुवार) विलंब झाला. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचा खोळंबा झाला. यामुळे ऐनवेळी 'एअर इंडिया'ने इतर कर्मचाऱ्यांना पाचारण करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. 

दिवाळीचा बोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कालपासून (बुधवार) अचानक काम बंद आंदोलन केले. हे सर्व जण 'एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड' या उपकंपनीचे कंत्राटी कर्मचारी आहेत. या उपकंपनीद्वारे देशातील सर्व विमानतळांवरील 'एअर इंडिया'च्या विविध सेवा हाताळल्या जातात. 

जवळपास पाच हजार कर्मचारी या सेवेत आहेत. यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने मुंबई विमानतळावरून आज सकाळपासून नियोजित असलेली उड्डाणे पुढे ढकलावी लागली. कायमस्वरूपी सेवेत असलेल्या आणि सध्या रजेवर किंवा सुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेण्यात आले. 

'आज सकाळी दहा देशांतर्गत उड्डाणे आणि तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना विलंब झाला. काही उड्डाणे जवळपास तीन तास पुढे ढकलावी लागली', असे 'एअर इंडिया'च्या प्रवक्‍त्याने 'पीटीआय'ला सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT