मुंबई

मद्य, सिगारेट नंतर आता दूधाचीही चोरी; व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची  कमतरता भासत आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुकाने फोडून चोरांनी किराणा मालावर डल्ला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दुकाने फोडून मद्याची चोरी केल्याच्या घटना घडल्याचे दिसून आले होते. 
लॉकडाऊनमध्ये चोरांचा सुळसुळाट असतानाच कल्याणमध्ये चक्क दूध पिशव्या चोरल्याची घटना समोर आली आहे.  यामुळे स्थानिक नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

कल्याण पूर्वेतील काटेमानेवली परिसरात शाम यादव यांची डेअरी आहे. यादव यांनी मागणी केलेल्या दुधाच्या पिशव्यांपैकी काही पिशव्या कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यादव यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या दुकानाबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तपासला तेव्हा मोटरसायकलवर आलेल्या तीन भामट्यांनी दूधाच्या पिशवीचा ट्रेच उचलून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सकाळच्या वेळी परिसरात शांतता असल्याने तसेच लॉकडाऊनमुळे रस्त्यावरही वर्दळ नसल्याने चोरांनी दूध चोरून पोबारा केला.

Alcohol, cigarettes now theft of milk; The video is viral in kalyan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT