मुंबई

रणबीर कपूरची गर्लफ्रेंड दिसणार हॉलीवुड चित्रपटात ?

सकाळ वृत्तसेवा

बॉलिवुड कलाकार हॉलीवुडमध्ये झळकणे हे काही नवीन नाही. मात्र जेव्हा एखादा बॉलिवुड कलाकार हॉलीवुडमध्ये झळकतो तेव्हा चर्चा ही होतेच. आणि अशीच एका अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. सध्या हॉलीवुडमध्ये झळकणाऱ्या कलाकारांमध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा ही नावं आहे. आता यात आणखी एका बॉलिवुड अभिनेत्रीचे नाव सामिल होण्याची शक्यता आहे. ही अभिनेत्री म्हणजे रणबीर कपूरची सध्याची गर्लफ्रेंड आलिया भट आहे. 

रणबीर कपूर आणि आलिया भटचं नातं जोरदार चर्चेत आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिकाही काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. 2020मध्ये दोघं लग्नाच्या  बेडीत अडकणार असंही  बोललं जात आहे. मात्र आता आलियावषियीची ही एक नवी बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे आलियाची हॉलीवुडमध्ये काम करण्याची इच्छा.

आलिया भटचा लॉस एंजलेसमधील एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमुळेच  आलिया लॉस एंजेलिसमध्ये एका आंतरराष्ट्रीय मॅनेजरच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे. आलियाला आता हॉलीवुडमध्ये काम करण्याची इच्छा असून तिने त्यासाठी तयारी देखील सुरु केली आहे. तर असही बोललं जात आहे की आलिया तिच्या  फ्रेड्ससोबत सुट्टीसाठी लॉस एंजेलिसला गेली आहे. 

आलिया भट ही बॉलिवुडमधील सध्या आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक आहे. तिच्या हातात सध्या बरेच बॉलिवुड प्रोजेक्ट्स आहेत. बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत ती 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. तर 'सडक-2'मध्येही आलिया दिसेल. संजय लीला भंसाळींच्या चित्रपटातही आलिया दिसणार आहे. हाताशी इतके चित्रपट असतानाही आलियाची पावलं हॉलीवुडकडे कशी वळली असाही प्रश्न सध्या समोर येत आहे. आता काय खरं आणि काय खोटं हे आलियाच सांगू शकेल.

Webtitle : Alia spotted in LA is alia shooting for Hollywood movie 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT