खड्डेमय रस्त्याच्‍या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर चव्हाण यांना सोमवारी घेराव घातला.
खड्डेमय रस्त्याच्‍या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर चव्हाण यांना सोमवारी घेराव घातला.  
मुंबई

अलिबागमध्‍ये खड्डेप्रश्‍नी ग्रामस्थ आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : तालुक्‍यातील वावेपासून ते सुडकोलीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील रस्तेदुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सुडकोली, भोनंग, फणसापूर, वावे, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ऍड. गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर चव्हाण यांना सोमवारी घेराव घातला. 

खड्डेमय रस्त्याची तत्काळ दुरुस्त करा, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली. यावर येत्या दोन दिवसांत खड्डे बुजविणार असल्याचे आश्‍वासन चव्हाण यांनी दिले. या वेळी नदीम बेबन, पृथ्वीराज पाटील, सुनील शेळके, भाऊ शेळके, ऍड. कौस्तुभ पुनकर, गिरीश शेळके, वैभव पाटील, प्रदीप झावरे, राकेश भोपी, गिरीश पाटील आदी उपस्थित होते. 

रोहा-अलिबाग मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. तळवली-भोनंग मार्गे फणसापूर फाटा या अंतर्गत रस्त्याचा सर्रास वापर होतो. मात्र सुडकोली, कुदे, नवखार, तळवली, भागवाडी, भोनंग, ताजपूर, दिवीपारंगी, फणसापूर, चिंचोटी, वळवली, वावे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना प्रवाशांसह चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

खड्डे चुकविताना अपघातही होण्याची भीती आहे. चार वर्षांपासून रस्त्याची दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ऍड. गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता मधुकर चव्हाण यांना घेराव घालून जाब विचारला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT