teacher
teacher sakal
मुंबई

शिक्षकांना ठाकरे सरकारने फसवलं ?

कुलदीप घायवट

दहावी आणि बारावीच्या निकालाच्या कामासाठी शिक्षकांना (Teacher)लोकल प्रवासाची मुभा ,असे ट्विट शिक्षणमंत्र्यांनी केले. तर, मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांच्या लोकल प्रवासास नकार दिला. यामुळे शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने शिक्षकांची फसवणूक ( State Government Cheating)केल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडी प्रदेशकडून(BJP Allegation)करण्यात आला आहे.

मुंबई : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या कामासाठी शिक्षकांना (Teacher)लोकल प्रवासाची मुभा ,असे ट्विट शिक्षणमंत्र्यांनी केले. तर, मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांच्या लोकल प्रवासास नकार दिला. यामुळे शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने शिक्षकांची फसवणूक ( State Government Cheating)केल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडी प्रदेशकडून(BJP Allegation)करण्यात आला आहे. गुरुवारी, (ता. 24) रोजी लोकलचे तिकिट (Train Ticket)घेण्यास गेलेल्या शिक्षकांना तिकिट देण्यास नाकारले.त्यामुळे शिक्षकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.(Allegation of BJP on State Government Cheats teachers train travelling permission)

मागील आठवड्यात शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना लोकल प्रवास करण्यासाठी मुभा दिल्याची घोषणा केली होती. त्यानुसार शाळांकडून दहावी आणि बारावीच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण उपसंचालकांनी गोळा करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून दिले गेले. शाळांनी माहितीही भरली, पण, बुधवारी, (ता. 23) जून रोजी प्रसारमाध्यमात पुन्हा मुख्यमंत्र्यांकडून ही परवानगी नाकारल्याचे वृत्त आल्यापासून शिक्षक-शिक्षकेतरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी, (ता. 24) रोजी शिक्षक लांब उपनगरातून शाळेत येण्यासाठी निघाले असता अनेक ठिकाणी त्यांना तिकिटे नाकारली. त्यामुळे शिक्षकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

मुंबईतील शाळेत आसनगाव, टिटवाळा, कल्याण-डोंबिवली, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, वसई-विरार, नवी मुंबईतून शाळेत येणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांना लोकल प्रवास सोयीस्कर पडतो. खासगी वाहनाने मुंबईत येण्यासाठी शिक्षकांना रोज 2 ते 3 हजार खर्च करावा लागतो. यामध्ये खासगी शाळेत अल्प वेतनावर काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांचे आर्थिक नुकसान होत आहे, असे भाजप शिक्षक आघाडीच्यावतीने सांगण्यात आले.

इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना 50 टक्के उपस्थितीची सक्ती केली आहे. वास्तविक पाहता या शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करून ऑनलाईन अध्यापन करणे शक्य असल्याने त्यांच्या 50 टक्के उपस्थितीचा आग्रह कशासाठी ?  इयत्ता दहावीच्या शिक्षकांना दहावीच्या निकालासंदर्भातील कामे पूर्ण होईपर्यंत लोकल प्रवासास परवानगी द्यावी 1 जुलैपासून त्यांनाही वर्क फ्रॉम करू द्यावे, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT