मुंबई

गोठवलेल्या खात्यांतून पगार देण्यास परवानगी 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कर्मचाऱ्यांचा पगार आणि दिवाळीचा बोनस देण्यासाठी गोठवलेल्या खात्यांतून पैसे काढण्याची एन. के. प्रोटीन प्रायव्हेट कंपनीला उच्च न्यायालयाने परवानगी देत दिलासा दिला. नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज लिमिटेड (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एन. के. प्रोटीनचे खाते आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) गोठवले होते. खात्यातील 4.15 कोटींची रक्कम काढण्यास नुकतीच उच्च न्यायालयाने परवानगी दिली. 

महाराष्ट्र प्रोटेक्‍शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (इन फायनान्शिल एस्टॅब्लिशमेंट) ऍक्‍ट अर्थात एमपीआयडी कायदा- 1999 (कलम 4 व 5) नुसार अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 18 ऑक्‍टोबरला काढलेल्या नोटीफिकेशनला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या कायद्यानुसार ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कंपनीची चार खाती आणि 35 वाहने जप्त केली होती. एनएसईएलच्या पाच हजार कोटींच्या गैरव्यवहारात तब्बल 13 हजार गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आल्याचा आरोप कंपनीवर आहे. एमपीआयडी कायद्यासह भारतीय दंडसंहितेतील विविध कलमांर्तगत ईओडब्ल्यूने कंपनीविरोधात 2013 मध्ये गुन्हा दाखल केला होता. कंपनीविरोधात केलेली कारवाई गळचेपू असून त्यामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात अडचणी येत असल्याची बाब कंपनीच्या वतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली; मात्र ईओडब्ल्यूच्या वकिलांनी यावर आक्षेप घेत याप्रकरणी अद्याप सुमारे 960 कोटींचे व्यवहार तपासणे बाकी असल्याचे सांगितले. ईडीने जप्त केलेली मालमत्ता सुमारे एक हजार कोटींची असून रक्कम काढण्याची परवानगी दिल्यास खात्यांतील व्यवहार तपासणे अवघड जाईल, परंतु कर्मचाऱ्यांचे वेतन रखडू नये म्हणून न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गोठवलेल्या खात्यातून रक्कम काढण्याची मुभा देत असल्याचे स्पष्ट करत सुनावणी तहकूब केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT