labour trap in deep hole
labour trap in deep hole sakal
मुंबई

Ambarnath News : 15 फूट खोल खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्याने तीन मजूर अडकले

प्रशांत पाटील

अंबरनाथ - अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात महानगर गॅसच्या लाईनीचे दुरुस्तीचे काम करीत असताना खोदण्यात आलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्याने खड्ड्यात काम करणारे तीनही कामगार मातीच्या ढिगार्‍यात रुतले होते.

अग्निशामक दलाच्या मदतीने या तीनही कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फॉरेस्ट नाका येथे महानगर गॅसचे मोठे स्टेशन असून या ठिकाणावरून संपूर्ण शहराला महानगर गॅसचा पुरवठा केला जातो. या स्टेशनवर येणारी मुख्य महानगर गॅसची लाईन दुरुस्तीचे काम करीत असताना 15 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता.

या खड्ड्यातील भले मोठे दगड देखील बाहेर काढून ठेवण्यात आले होते. खड्डा खोदत असतानाच रस्त्याच्या वरती ठेवण्यात आलेल्या मातीचा ढिगारा अचानक कोसळला आणि खड्ड्यात काम करणाऱ्या तीन कामगारांच्या अंगावर पडला. या मातीसोबत भले मोठे दगड देखील पडल्याने हे तीनही कामगार कमरेपर्यंत मातीत रुतले होते.

सुरेश मोरे, कालीचंद्र आणि लक्ष्मण यमकर असे तीनही कामगारांचे नाव असून त्या तीनही कामगारांना वाचवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले.

खड्ड्यात पडलेले भले मोठे दगड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून मातीचा ढिगारा अलगदपणे काढण्यात आला आणि त्यानंतर त्या कामगारांना सुखरूप पणे बाहेर करण्यात आले आहे.

महानगर गॅसच्या लाईनच्या दुरुस्तीचे काम करताना कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवल्याने आता महानगर गॅस च्या विरोधात देखील संताप व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT