Anganwadi workers Sakal
मुंबई

Anganvadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू!

Palgar: आशा कार्यकर्ती, सरपंच, ग्रामसेवकांची मदत घेणार.

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

Anganvadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या संपाला एक महिना ऊलटुन गेला आहे. त्यामुळे कुपोषण ग्रस्त  पालघर जिल्ह्यात, कुपोषीत बालकांचा पोषण आहार बंद झाला आहे. त्यामुळे कुपोषणाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.

कुपोषीत बालकांना पोषण आहार मिळावा म्हणून पालघर जिल्हा प्रशासनाने, ग्रामपंचायती निहाय सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बैठका घेऊन, आशा कार्यकर्तीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रशासनाला दिले आहेत.

  राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी संपाची धार अधिकच तीव्र केली आहे. त्यांनी   4  डिसेंबर  2024  पासून राज्यात काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

अंगणवाडी कर्मचार्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळावा, शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळावा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, दरमहा निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा आणि अंगणवाडी च्या कामकाजासाठी मोबाईल फोन द्यावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांवर ठाम आहेत.

अंगणवाडी मार्फत किशोरवयीन मुली, गरोदर महिला, स्तनदा माता, शुन्य ते सहा वयोगटातील बालकांना पुरक पोषण आहार, पुर्व शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि संदर्भीत सेवा पुरविण्यात येतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे कुपोषीत बालकांना सकस आणि पौष्टिक पोषण आहार देणे आहे. संपामुळे ही सर्व कामे बंद पडली आहे. तर मासिक मिटींगा, मासिक अहवाल, ट्रेनिंग, ऑनलाईन माहिती भरणे ही सर्व प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. 

                   अतिदुर्गम पालघर जिल्हा कुपोषण ग्रस्त आहे. जिल्ह्यात  2  हजार  799  अंगणवाडी केंद्र आहे. त्यामध्ये  1  लाख   48   हजार   320   बालके आहे. या सर्व बालकांना सकस आणि पौष्टिक पोषण आहार दिला जातो.  ऑक्टोबर  2023  च्या सरकारी अहवालानुसार या बालकांमध्ये अतितीव्र  135   आणि   1  हजार   650   मध्यम कुपोषीत बालके आहेत. या बालकांना अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे पोषण आहार देणे बंद झाले आहे. अंगणवाडी सेविका संपात ऊतरल्याने नोव्हेंबर आणि डिसेंबर  2023  ची कुपोषीत बालकांची अधिकृत आकडेवारी ऊपलब्ध झालेलीच नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यात कुपोषीत बालकांची संख्या वाढण्याची भीती बळावली आहे. 

अंगणवाडी सेविकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेने सरपंच, ग्रामसेवक आणि आशा कार्यकर्ती ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये बैठका घेऊन अंगणवाडी सेविकेला कामावर हजर होण्यासाठी उपकृत केले जाणार आहे. कुपोषीत बालकांप्रती संवेदनशील होऊन, आपल्या मागण्या कायम ठेवत तसेच निषेध नोंदवत  कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका कामावर हजर न झाल्यास, आशा कार्यकर्ती , ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या माध्यमातून कुपोषीत बालकांना पोषण आहार देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयाची आज पासून तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली आहे.  

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायती च्या सरपंच, ग्रामसेवक आणि आशा कार्यकर्ती ला तशा सुचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निहाय बैठका घेणे आज पासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कुपोषीत बालकांच्या पोषण आहारा बाबत सकारात्मक विचार होण्याची आशा निर्माण झाली आहे. 

कुलदीप जाधव, गटविकास अधिकारी, मोखाडा.       

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT