Anil Parab warning to municipal officials during jan akrosh morcha by the Uddhav Thackeray group  
मुंबई

Anil Parab : …तर अधिकाऱ्याला बोलवून त्याठिकाणी बुडवणार! ठाकरे गटाच्या हंडा मोर्चात परबांचा इशारा

रोहित कणसे

ठाकरे गटाकडून आज मुंबई पालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्च्यात बांद्रा सांताक्रुज भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

पाण्यासाठी मोर्चेकरी महिला हंडा डोक्यावर घेऊन या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. मनपा भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध अश्या प्रकारच्या बोर्ड हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

परब यांचा अधिकाऱ्यांना इशारा

यावेळी बोलतना अनिल परब म्हणाले की, आज स्थानिकांच्या प्रश्नावर आम्ही मोर्चा घेऊन आलो आहोत आम्ही पालिका प्रशासनाला पंधरा दिवसांचा वेळ देतोय, स्थानिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं.

या अगोदर मी दोन वेळा वॉर्ड ऑफिसरला भेटण्यासंदर्भात पत्र दिलं होतं पण आम्ही भेटायला येणार तर वॉर्ड ऑफिसर सुट्टीवर जातात, त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढला, आता पंधरा दिवसांचा त्यांना आम्ही वेळ घेतोय त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा.

आमची शाखा तोडली त्या शाखेवर बाळासाहेबांचा फोटो असताना देखील हातोडा मारला यावर शिंदे गटांचं म्हणणं काय असा सवाल देखील परब यांनी यावेळी केला.तसेच जे विरोध करतायेत त्यांना येऊन सांगा ही स्थानिक नागरिक आमच्या मोर्चात सहभागी आहेत असेही ते म्हणाले.

दरम्यान पंधरा दिवसात स्थानिकांचा प्रश्न सोडवला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरचं पाणी आम्ही तोडू, तसेच जो कचरा विभागात साठेल तो कचरा अधिकाऱ्यांच्या घराच्या समोर नेऊन टाकू मग त्यांना सामान्य शिवसैनिकांचा आणि नागरिकांचा दुःख कळेल असेहाी परब म्हणाले.

गेली दीड वर्ष इथ नगरसेवक नाहीये, हा शिवसैनिकांचा मोर्चा नाही, हा स्थानिकांचा मोर्चा आहे. जिथे जिथे जातोय तिथं पाणी प्रश्न गंभीर आहे. जिथे जिथे गेलो तिथ सांगतायत की पहिला पाण्याचा प्रश्न सोडवा. आपल्याला भागात 80 टक्के भाग हा झोपडपट्टी आहे, तीनवेळा णी वार्ड ऑफिसरला वेळ मागितली तर ते सुट्टीवर जातातय

एक दोन वेळा ठीक होतं, आता कायम झालंय त्यामुळे वार्ड ऑफिसरने लक्षात ठेवावं की जिथून जातायत तो रस्ता आमच्या बापाचा आहे. अधिकाऱ्यांच्या घरी पाणी येतंय आमच्याकडे 15 दिवसात पाणी आलं नाही तर अधिकाऱ्यांच्या घरचं मी जाऊन पाणी कापेन.

जेव्हा त्यांच्या बिल्डिंग मधलं पाणी बंद होईल तेव्हा त्यांचे अब्रू जाईल. मुंबई महानगर पालिका आमच्या हातात होती तर आम्ही महानगर पालिकेच्या कामाला लागायचो. मेट्रोची काम सुरु आहेत त्याच डेब्रिज नाल्यात येत आहे.

मी आताच सांगतोय पाणी तुंबल आणि नागरिकांना त्रास झाला तर अधिकाऱ्याला बोलवून त्याठिकाणी बुडवणार. शिवसेनेची ताकद काय आहे ते दाखवायला लावू नका. ज्यावेळी होईल तेव्हा तुम्हाला काय करायचं ते करा मला अटक केली तरी चालेल, पोलिसांना आताच सांगतो आताच अभ्यास करा आणि माझ्यावर कोणती कलम लावायची त्याचा आताच अभ्यास करा, असेही परब यावेळी म्हणाले.

ठाकरे गटाच्या मागण्या काय आहेत?

  • अनियमित, अपूरा आणि दुषित पाणी पुरवठा केला जावा.

  • पावसाळ्यापूर्वी झालेली अपूर्ण नाले सफाई पूर्ण करावी

  • संथ गतीने सुरु असलेल्या जे. पी. रोड, तीन बंगला, खेरवाडी, खेरनगर, बेहरामपाडा, बापूजी स्टॉल स्टेशन रोड येथील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम

  • दत्तक वस्ती योजना - पूर्णपणे बारगळली असून, पूर्ण बोजवारा वाजला आहे.

  • कचरा कुंडीतील कचरा उचलला जात नाही, महापालिका पायाभूत सुविधा निधी अनियमितता अशा अनेक मागण्यासाठी ठाकरे गट मोर्चा काढला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT