मुंबई

पीएमसी बॅंकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पीएमसी बॅंकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलूंड येथे ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पीएमसीच्या तीन खातेदारांचा मृत्यू झाला असून आजची ही चौथी घटना आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी बॅंकेतून पैसे काढता न आल्याने हा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

मुरलीधर धर्रा हे मुलुंडचे रहिवाशी असून ते मागील काही दिवस आजारी होते. दरम्यान त्यांचे पीएमसी बॅंकेत खाते होते. त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांचा मुलगा प्रेम याला बॅंकेतून पैसे काढता आले नाहीत. असा आरोप धर्रा यांच्या कुटुंबियाने केला आहे. गेल्या आठवड्याभरात पीएमएसी बॅंक खातेदारांपैकी हा चौथा बळी आहे.

आरबीआयने पीएमसी बॅंकेवर आर्थिक बंधने लादल्यानंतर बॅंकेच्या खातेधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आंदोलने, मूक मोर्चा अशा विविध मार्गांनी खातेधारक आपला संताप व्यक्त करत होते. अशाच एका आंदोलनात सहभागी झालेल्या ओशिवरा योथील (59) खातेधारक संजया गुलाटी आणि फत्तेमुल पंजाबी (59) यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अंधेरी येथील डॉ. योगिता बिजलानी यांचा ही मृत्यू झाला होता. या सर्वांचे पीएमसी बॅंकेत खाते होते. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT