मुंबई

बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या अडचणीत वाढ 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेविका अरुंधती दुधवडकर आणि पती अरुण यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. पालिकेच्या पदाचा गैरवापर करत, केलेल्या बांधकामप्रकरणी त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते संजय दुबे यांनी याचिका दाखल केली आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेकडे तक्रार केल्यानंतरही त्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. शिवसैनिक असलेले अरुण दुधवडकरही माजी नगरसेवक होते. सध्या त्यांच्या पत्नी अरुंधती शिवसेना नगरसेविका आहेत. ताडदेवमधील दीपक अपार्टमेंट सुपारीवाला इमारतीत दुधवडकर दाम्पत्याचे घर आहे. ताडदेव टॉवरशेजारील व्हॅलेंटाईन क्‍लबला जोडून एक बांधकाम करण्यात आले आहे. क्‍लबशेजारील मोकळ्या मैदानावरील संरक्षक भिंत वाढवत अनधिकृत बांधकाम केले गेले असून त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही असा आरोप आहे. दुधवडकर यांच्या वरदहस्तामुळे बांधकाम झाल्याचा दावा दुबे यांनी याचिकेत केला आहे. येत्या काही दिवसांत याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT