File Photo
File Photo 
मुंबई

भिवंडीत रूग्णासह नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः भिवंडी शहरातील नारपोली देवजी नगर परिसरात असलेल्या स्व. काशिनाथ पाटील रुग्णालयामध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमी रूग्णांचे नातेवाईक व रूग्णाने तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मंगळवारी मुस्तफा खान असे नाव असलेल्या एका तरुणाला जखमी अवस्थेत अनोळखी इसमाने उपचाराकरता दाखल केले, मात्र या मुस्तफा याची परिस्थिती गंभीर असल्याकारणाने डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केले.

काही वेळानंतर या तरुणाचे नातेवाईक रुग्णालयामध्ये आले व त्यांची गर्दी आयसीयू विभागात वाढू लागल्यान डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमधून बाहेर जाण्यास सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून रुग्ण मुस्तफा खान व नातेवाईकांची डॉक्टरांशी बाचाबाची झाली. यातून नातेवाईक व मुस्तफा यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करीत मारहाण केली.

तसेच रुग्णालयात तोडफोड करायला सुरुवात केली. हा प्रकार शांत करण्यासाठी आलेल्या डॉ. शाहिद अली खान, डॉ. स्वाती शाहिद खान, विठोबा पाटील, कैलास म्हात्रे  व इतर कर्मचाऱ्यांनाही त्यांनी धक्काबुकी करत मारहाण केली. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी जाब जबाब घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

घटनेचा संपूर्ण प्रकार रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. नारपोली पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत आहे. पोलिसांनी मुस्तफा खानला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT