मुंबई

वाळूमाफियांची दादागिरी 

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा, ता. 19 (बातमीदार) : विरारमध्ये वाळूमाफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. विरार खार्डी रेती बंदरावर कारवाईसाठी गेलेल्या पालघर पोलिस अधीक्षकांच्या अंगरक्षकाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न रेतीमाफियांनी केला आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 15 जेसीबी, दोन डम्पर व रेती असा एकूण 2 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. 

विरार पूर्वच्या खणीवडे, खार्डी, काशीद कोपर या परिसरातून अनधिकृत रेतीचे उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची माहिती पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिस अधीक्षक गौरव सिंग हे स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता स्वत: आपला अंगरक्षक पोलिस शिपाई दिनेश पाटील आणि वाहनचालक पोलिस शिपाई राहुल दळवी यांच्यासह खार्डी रेती बंदरावर पोहचले आणि रेती व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

या वेळी एका रेतीच्या ट्रकचालकाने चक्क पोलिस अधीक्षकांच्या समोरच त्यांचा अंगरक्षक पोलिस शिपाई दिनेश पाटील याच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडताच तत्काळ कारवाई करत घतनास्थळावरून 15 जेसीबी, 2 डंपर आणि रेती असा 2 कोटी 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शासकीय कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न, रेतीची चोरी असे गुन्हे दाखल करत तीन जणांना अटक करण्यात आली. 

पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी जिल्ह्याचा पदभार घेताच विरार हद्दीतील सर्व रेतीचोरी बंद केली होती; मात्र आता गौरव सिंग यांच्याच अंगरक्षकावर वाळूमाफियांनी गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात पुन्हा एकदा वाळूमाफियांची दहशत पसरली आहे. 


 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT