murder
murder sakal
मुंबई

Badlapur Crime : सासऱ्याच्या हातून जावयाची हत्या; मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या जावयाला सासऱ्याने फेकले नदीत

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी जाधव

बदलापूर - दारू पिऊन सतत मुलीला व आपल्या संपूर्ण कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या जावयाला सासर्‍याने जबर मारहाण केली. यावेळी मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या जावयाला सासऱ्याने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून, त्यानंतर बारवी नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर - मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा या गावात घडली आहे.

यावेळी गंभीर जखमी झालेल्या जावयाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणात कुळगांव ग्रामीण पोलिसांनी सासरा संतोष नाईक याला अटक केली आहे.

बदलापूर मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा या गावात बारवी नदीवरील पुलाखाली, १ मार्च रोजी दगडावर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळली होती. याप्रकरणी कुळगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी. एस. स्वामी यांनी तपास पथकाची उभारणी केली.

या दरम्यान तपास करतेवेळी योगेश केणे, (वय-३८) याचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पुढील तपास करत असताना धक्कादायक बाबीचा उलगडा झाला. २९ फेब्रुवारी रोजी दारुच्या नशेत योगेश केणे याने सासरा संतोष नाईक याला शिवीगाळ केली होती. त्यावेळी या वादातून संतोष याने त्याला पकडून ठोशाबुक्याने मारहाण केली.

यावेळी मारहाणीत योगेश बेशुद्ध होऊन खाली पडला व त्याचवेळी, सासरा संतोष याने योगेशला प्लास्टिकच्या पिशवीत भरले. त्यानंतर ही पिशवी दुचाकी वरून घरापासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर, मोऱ्याचा पाडा गावाच्या हद्दीत असलेल्या, बारवी नदीच्या पुलावरून ढकलून नदीत फेकून दिले. मात्र यात गंभीर जखमी झालेल्या योगेश चा मृत्यू झाला.

यासंबंधी सासरा संतोष नाईक याला ३०२ गुन्हा अंतर्गत अटक करण्यात आली असून, उलट तपासणी केल्यानंतर त्यानेच हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे. सध्या संतोष कुळगां,व ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत असून, येत्या २६ मार्च रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कुळगांव ग्रामीण पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT