Obscene Remarks Against Female Journalist by Former Municipal Chairperson
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चार वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२-१३ ऑगस्ट २०२४ रोजी घडलेल्या या घटनेत, शाळेतील २३ वर्षीय सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने मुलींच्या शौचालयात मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. शाळेत मुलींच्या टॉयलेटजवळ महिला कर्मचाऱ्याची नेमणूक न झाल्यामुळे या आरोपीला अशा घाणेरड्या कृत्याला वाव मिळाला.
शाळेकडून मुलींच्या शौचालयाच्या देखभालीसाठी नेमलेल्या शिंदेची १ ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली होती. एका चिमुरडीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर पालकांना या घटनेचा संशय आला. त्यांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला असता, त्यांनीही त्यांच्या मुलीने शाळेत जाण्याच्या भीतीची तक्रार केली होती. यानंतर मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
पालक तक्रार करायला गेले तेव्हा त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. या घटनेत एफआयर दाखल करायला ११ तास लागले. ही संपूर्ण घटना सकाळच्या महिला पत्रकाराने महाराष्ट्रासमोर आणली.
या गंभीर घटनेचे वार्तांकन सकाळच्या महिला पत्रकाराने केले. मात्र, या वार्तांकनामुळे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी पत्रकारावर अर्वाच्च भाषेत टीका केली. "तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे," अशी अशोभनीय भाषा म्हात्रे यांनी वापरली. या विकृत वृत्तीच्या वक्तव्यामुळे पत्रकारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार एकप्रकारे विनयभंग असून पत्रकारांनी या विकृतीचा कडक निषेध केला आहे.
बदलापूरमधील या घटनेनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकारात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील राजकारणी जर असे वागत असतील, तर त्यांच्या विरोधात कारवाई कोण करणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महिला पत्रकारांच्या सुरक्षेची आणि सन्मानाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केले आहे.
बदलापूरमधील या घटनेने समाजातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मुलींच्या शाळांमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांची पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. तसेच पत्रकारांबाबत होणाऱ्या अशा हल्ल्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.