who is akshay shinde badlapur school case esakal
मुंबई

Who is Akshay Shinde: कोण आहे काठीवाला दादा? बदलापूर प्रकरणातील आरोपीकडे शाळेने दिली होती 'ही' जबाबदारी

Badlapur Latest Updates: अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडित चिमुकलीने प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं घरी सांगितलं. पीडितेच्या आजोबांना प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांना याबाबत सांगितलं. सखोल चौकशी केल्यानंतर दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. ज्याने हा प्रकार केला त्याचा उल्लेख चिमुकल्यांनी 'काठीवाला दादा' असा केला होता.

संतोष कानडे

Badlapur School Crime: दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही रेल्वे ट्रॅकवरुन उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या घटनेतला आरोपी अक्षय शिंदे हा नेमका कोण आहे, हे पाहूया.

अक्षय शिंदे हा संबंधित शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. शाळेमध्ये स्वच्छता ठेवणे, मुलांना वॉश रुमला घेऊन जाणे, अशी जबाबदारी त्याच्यावर होती. अक्षयचं वय २४ वर्षे आहे. शाळेमध्ये आऊटसोर्सिंगद्वारे त्याची नेमणूक झाली होती. त्याने शाळेतल्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली.

अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडित चिमुकलीने प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं घरी सांगितलं. पीडितेच्या आजोबांना प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांना याबाबत सांगितलं. सखोल चौकशी केल्यानंतर दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. ज्याने हा प्रकार केला त्याचा उल्लेख चिमुकल्यांनी 'काठीवाला दादा' असा केला होता.

दुसरीकडे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या पालकांना पोलिसांनी १२ तास ताटकळत ठेवलं होतं. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सीनिअर पोलिस इन्स्पेक्टर शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आलेली आहे. तर बदलापूर ठाण्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय.

दरम्यान, आरोपी अक्षय हा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. आरोपी अक्षयला पाहताच पोलिसांना त्याच्या विकृत मनस्थितीची जाणीव झाली. मात्र, ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात का आली नाही? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack Case: वैद्यकीय चमत्कार! हार्टअटॅकने हृदयाचा एक भाग फाटला, रक्ताच्या गाठी जमा झाल्या... तरीही सोलापूरच्या डॉक्टरांनी वाचवले प्राण

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे एका व्यासपीठावर, फडणवीसही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला, CSKने तुक्का मारला अन् स्टार सापडला; एबी डिव्हिलियर्सने IPL फ्रँचायझीचे टोचले कान

HSRP Number Plate: 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! HSRP नंबर प्लेटसाठी आजच अर्ज करा

BJP आमदाराच्या मुलाने रस्त्यात गाडी लावल्यानं वाहतूक कोंडी, पोलिसांशी हुज्जत घालत म्हणाला, चल निघ

SCROLL FOR NEXT