
ट्राफिक पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी रस्त्यात उभा असलेली गाडी हटवण्यास सांगितल्यानं भाजप नेत्याचा मुलगा संतापला. यानंतर त्याने पोलिसांशी हुज्जत घालत चल निघ इथून असं म्हटलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप नेत्यावर टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये ही घटना घडली असून तपेश सिंह असं भाजप नेत्याच्या मुलाचं नाव आहे. तो आमदार ऋषिपाल सिंह यांचा मुलगा आहे.