डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ चेंडूंमध्ये ट्वेंटी-२० शतक ठोकले, जे त्या संघाविरुद्धचे सर्वात वेगवान शतक ठरले.
ब्रेव्हिसने ५६ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ८ षटकारांसह १२५ धावा करून दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वोत्तम वैयक्तिक T20 कामगिरी केली.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ पूर्वी ब्रेव्हिसला रिलीज केले आणि कोणत्याही फ्रँचायझीने मेगा ऑक्शनमध्ये त्याला घेतले नाही.
AB de Villiers Slams IPL Teams for Ignoring Dewald Brevis : दक्षिण आफ्रिकेच्या युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिसने ( Dewald Brevis ) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले. दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात त्याने ४१ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ट्वेंटी-२०तील वेगवान शतक ठरले. आफ्रिकेसाठी ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो युवा फलंदाज ठरला. आता डेवॉल्डची फटकेबाजी पाहून मुंबई इंडियन्सने डोक्यावर हात नक्की मारून घेतला असेल अन् चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मात्र आनंदाचे वातावरण असेल.