मुंबई

महाविद्यालयीन तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्यास चोप

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : महाविद्यालयीन तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या एका निमसरकारी कर्मचाऱ्यास कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी युवक महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आहे. काही विद्यार्थ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने वासनांध युवकास चांगला चोप दिला.

याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या या युवकाविरोधात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कामोठे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोडणाऱ्या एका नामांकित महाविद्यालय परिसरात गुरुवारी हा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात येताच तरुणीने याबाबत आरोपीस जाब विचारत मारहाण केली. या वेळी महाविद्यालयात शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनीदेखील सदर आरोपीस चोप दिला. तसेच घटनेची माहिती कामोठे पोलिस ठाण्यात दिली. 

कामोठे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने सुरुवातीला आपण पोलिस कर्मचारी असल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतील या भीतीने महाविद्यालयातील तरुणांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यास विरोध करत आधी तक्रार दाखल करून घेण्याची मागणी केली.

या वेळी महाविद्यालय परिसरातील वातावरण काही काळ तंग झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणल्यानंतरही आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी कामोठे पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT