मुंबई

बेस्ट "शिवशाही'च्या मार्गाने! 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - चालकांना धाक नाही आणि वेगावर नियंत्रण नसल्याने "शिवशाही' एसटी बसचे अपघात वाढत आहेत. बेस्ट उपक्रमही 713 गाड्या भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यामुळे "बेस्ट'चा प्रवास "शिवशाही'च्या मार्गाने सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्यास प्रवास किती सुरक्षित राहील, अशी चर्चा बेस्टच्या वर्तुळात सुरू आहे. 

बेस्टने नुकताच 410 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प जाहीर केला. बेस्टची तूट वाढत चालल्याने बेस्टला गाड्यांची खरेदी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे 2020 पर्यंत 713 बस भाडेतत्त्वावर घेऊन, गाड्यांचा ताफा 4,020 इतका वाढवण्यात येणार आहे. गाड्यांमध्ये वाहक खासगी कंत्राटदाराचा असण्याची शक्‍यता आहे; परंतु भाडेतत्त्वावरील गाड्या किती सुरक्षित असतील, असा प्रश्‍न सध्या काम करीत असलेल्या कामगारांना पडला आहे. 

"शिवशाही' सुरू झाल्यानंतर त्यांचे सुमारे 40 पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. वेगावर नियंत्रण नसणे, चालकांवर अंकुश नसणे आदी प्रकारांमुळे एसटीच्या गाड्यांचे चालकही शिवशाही चालवणाऱ्यांवर नाराज आहेत. तीच स्थिती बेस्टमध्ये होऊ शकते, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली आहे. भाडेतत्त्वावर बस घेण्याबाबत अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले असले तरी अद्याप अर्थसंकल्पाला बेस्ट समिती, स्थायी समिती आणि पालिकेच्या सभागृहाची मंजुरी मिळायची आहे. भाडेतत्त्वावर बस खरेदी करताना कोणत्या अटी घालण्यात येतील त्यावर प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याला आणि बसची संख्या वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने नव्या गाड्या भाडेतत्त्वावर घेणार आहोत. "बेस्ट'च्या उत्पन्नाशी हा विषय निगडित आहे. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल. 
- डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट. 

भाडेतत्त्वावर गाड्या घेऊन चालवणे हे "बेस्ट'चे खासगीकरणच आहे. भाडेतत्त्वावरील गाड्यांवर बेस्टचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही. असे होणे हे सत्ताधारी शिवसेना व भाजप युतीचे अपयश आहे. 
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका. 

सध्याच्या गाड्यांचा ताफा - 3,337 
चालकांची संख्या - 11,000 
वाहकांची संख्या - 12,000 


अपघात वाढण्याची भीती 
बेस्ट आपल्या चालकांना सात महिन्यांचे प्रशिक्षण देते. भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाड्या चालवणाऱ्या चालकांच्या प्रशिक्षणाचे काय? त्यांच्याकडून अपघात होण्याचा धोका आहे, अशी भीती "बेस्ट'च्या वाहकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT