Beware of politics of revenge shiv sena Dipali Sayyed Jitendra Awhad mumbai
Beware of politics of revenge shiv sena Dipali Sayyed Jitendra Awhad mumbai sakal
मुंबई

सूडाच्या राजकारणापासून सांभाळून चाला - दिपाली सय्यद

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - आव्हाड साहेबांनी सांभाळून चालले पाहिजे. आत्ताचे राजकारण हे सूडबुद्धी चे राजकारण आहे. या सूडाच्या राजकारणापासून आपल्याला संभाळून चालले पाहिजे शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सल्ला. भाजपचे शिष्टमंडळाने केंदीय निवडणूक आयोगास पत्र पाठविले आहे. त्यात काँगेसध्या नेत्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करा अशी मागणी केली आहे. यावर शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वरील सल्ला दिला.

शिवसेनेचे माजी महापौर रमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कल्याण पूर्वेत साईनगर येथे शिवसेना प्रवक्त्या व अभिनेत्री दिपाली सय्यद शुक्रवारी आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपाने निवडणूक आयोगाकडे ठाकूर, आव्हाड व कांदे यांचे मत बाद करण्याची मागणी केली आहे. यावर मतदान करताना नियमांचा भंग झाला असेल किंवा काही त्याविषयी त्यांनाच जास्त माहिती असेल. मात्र मंत्री आव्हाड यांनी सूडाच्या राजकारणा पासून सांभाळून चालावे असा सल्ला सय्यद यांनी दिला. तसेच भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे.

त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याविषयी दिपाली यांनी हे कुठे तरी थांबले पाहिजे हे नक्की असे म्हणत सांगितले की, राजकारण ज्या पद्धतीने चालले आहे, समाज माध्यमाचा ज्या पद्धतीने वापर केला जातो ते ठीक नाही. पक्ष प्रवक्ताचे काम आपल्या पक्षाची बाजू ठेवण असतात. पण याचा अर्थ असा नाही की, काही ही बोलावे. आपला भारत देश असून वेगवेगळ्या पंथाचे, धर्माचे लोक आहेत. त्या धर्माला काहीही बोलणे, किंवा टिपण्णी करणे हे कितपत योग्य आहे, ते बरोबर नाही. नुपुरला पक्षातून काढण्याची मागणी होत आहे, पण इतर पक्षात देखील काही प्रवक्ते, विरोधी पक्षनेते असे आहेत की ते सुद्धा अशाच पद्धतीने वक्तव्य करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे, कारण अशा पद्धतीने बोलून आपण समाजाला काय देतो हे समजले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT