मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या एमआयडीसीला मिळणारी जमीन ही फरार उद्योगपती नीरव मोदीची असल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत केल्याने खळबळ उडाली.
या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यावर, ही जमीन फरार नीरव मोदी याचीच आहे का, याची सखोल चौकशी केली जाईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहाला दिले.
आमदारांच्या मतदारसंघातील वादाचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे नगरमधील जामखेड एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केला. जामखेडमध्ये एमआयडीसी का झाली नाही? कर्जतच्या ‘एमआयडीसी’ला कधी मंजुरी मिळणार? असे सवाल राम शिंदे यांनी केले.
ही लक्षवेधी मांडताना राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. त्यांची नावे नीरव मोदी, मनीषा कासोले, नयन गणेश अग्रवाल अशी आहेत. मग, एमआयडीसीची निर्मिती गुंतवणूकदारांसाठी की शेतकरी, बेरोजगारांसाठी करायची,
असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उदय सामंत यांनी कर्जतला एमआयडीसी करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. पण, तिथे नीरव मोदीने जमीन घेतल्याचे समोर आले आहे. हा नीरव मोदी लंडनला पळून गेलेलाच आहे की स्थानिक आहे, याची माहिती घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
तीन महिन्यांत निर्णय घेणार
भूनिवड समितीने संबंधित जागेची पाहणी केली आहे. मात्र, जलसंपदा विभागाने इथे पाणीपुरवठा करण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असेही उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले. या चर्चेत अरुण लाड, सत्यजित तांबे, सचिन अहीर, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.