मुंबई

प्रत्युत्तर देत नितेश राणेंनी वरुण सरदेसाईंना दिला लग्नाबाबतचा सल्ला

पूजा विचारे

मुंबई: सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर वरुण सरदेसाई आणि नितेश राणे हे आमने-सामने आले आहेत.  सोमवारी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. तसंच एनआयएने यासंदर्भात चौकशी करण्याची मागणीही राणे यांनी केली होती. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला. नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. दरम्यान नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांना लक्ष्य केलं आहे. 

काल वरुण सरदेसाई यांच्याकडून जे काही स्पष्टीकरण देण्यात आले  ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतो. ही माहिती तपासून घ्या हे एनआयएला मी सांगितलं असून लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे, असं नितेश राणे म्हणालेत. एवढचं काय तर तपास यंत्रणांनी मागणी केल्यास त्यांना आम्ही पुरावे देऊ, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मला धमकी देताय का?  अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, असं म्हणत त्यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर पलटवार केला आहे. मला जी माहिती आहे ती तपास यंत्रणांना देणार यांना कशाला देऊ ? असंही ते म्हणाले. 

आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले.   माझ्या देशाविरोधात माझ्या राज्यविरोधात कुणी काही करत असेल तर तर मी बोलणारच, असंही ते म्हणालेत. 

त्याचे नातेवाईकचं मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना सुरक्षा आहेच, असं म्हणत तुझं लग्न होत नाही तर shaadi.com वर जा, असा सल्ला नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांना दिला आहे. 

पुन्हा अशा धमक्या देऊ नका, नाहीतर आणखी एक पत्रकार परिषद घेऊन ही सगळी प्रकरणे बाहेर काढावी लागतील. मग बघू महाराष्ट्रात कसे फिरता ते असंही ते म्हणालेत.

मी पत्रकार परिषदमध्ये  पश्चिम उपनगरातले नेते असा उल्लेख केला तर मग अनिल परब यांना बोलायची गरज काय ? हे काय नेते आहेत का ? युवानेते बोललं की आदित्य ठाकरे स्पष्टीकरण देतात का अशी टीका त्यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर केली. 

Bjp mla Nitesh Rane reply Shivsena leader Varun Sardesai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT