मुंबई

का म्हणतायत BMC आयुक्त ट्रेन-टू-बी-ऑन-टाइम ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 17 : मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविणसिंग परदेशी हे एका महत्त्वाच्या कामासाठी निघाले.मात्र खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे कार्यक्रमाला वेळेत पोहोचणं शक्य नव्हतं.यामुळे आयुक्तांनी चक्क ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि ते वेळेत पोहोचले देखील. आपल्या प्रवासाचं फोटो ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणारे ट्रॅफिक यावर पालिका आता तरी गांभीर्याने विचार करेल का हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

पालिका आयुक्तांची चर्चगेटला महत्वाची बैठक होती.या बैठकीला नेदरलँड देशातील राजा आणि राणी उपस्थित राहून इंडो-डच करार केला जाणार होता. मात्र राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या आयुक्तांना आपल्या गाडीने चर्चगेटला वेळेत पोहोचणं शक्य नव्हतं. यावेळी खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाली होती. यामुळे आयुक्तांनी राम मंदिर रेल्वे स्थानकातून ट्रेन ने चर्चगेट गाठण्याचा निर्णय घेतला.

आपल्या ट्रेन प्रवासाची माहिती आयुक्तांनी ट्विट करून दिली आहे. या माहितीनुसार 2 वाजून 44 मिनिटांची ट्रेन अगदी वेळेवर आली. ट्रेनचा प्रवास ही सुखकर झाला असून अगदी वेळेत चर्चगेटला पोहोचता आलं. एकप्रकारे मुंबईतील खड्डे आणि वाहतूक कोंडी मधून रेल्वे ने आयुक्तांची सुटका केली. आजच्या या घटनेमुळे मुंबईतील रोजची खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या समोर आली आहे. ट्रेन प्रवासामुळे आयुक्तांची यातून सुटका झाली असली तरी मुंबईकरांनी सुटका कधी होईल असा प्रश्न विचारला जातोय.

WebTitle : bmc commissioner travelled by mumbai local train to avoid traffic and potholes  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT